बायपास नसल्याने वाहतुकीची कोंडी

By Admin | Published: May 24, 2015 10:46 PM2015-05-24T22:46:53+5:302015-05-24T22:46:53+5:30

अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक नियमन करणारी अपुरी यंत्रणा यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या स्थानिकांसह पर्यटकांना नेहमीच मनस्ताप देणारी ठरते.

No traffic bypass, due to no bias | बायपास नसल्याने वाहतुकीची कोंडी

बायपास नसल्याने वाहतुकीची कोंडी

googlenewsNext

मुरुड : अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक नियमन करणारी अपुरी यंत्रणा यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या स्थानिकांसह पर्यटकांना नेहमीच मनस्ताप देणारी ठरते.
मुरुड या पर्यटनस्थळी नांदगाव येथे बायपासची सुविधा नसल्यामुळे नांदगांव बस स्टॉप ते हनुमान मंदिर दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. त्यातूनच रस्त्यावर उभी केलेली वेडीवाकडी वाहने पार्क करताना कुठलाही धरबंध नसल्याने वाहन चालकांना मोठी डोकेदुखी ठरु पाहलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बायपासचा मुद्दा ऐरणीवर येतो. त्यानंतर कुठलीही कार्यवाही होत नाही असे चित्र दिसते.
विशेषत: वीकेंडला वाहतुकीची मोठी कोंडी होताना दिसते. स्थानिक नागरिकच वाहतूक नियमनाचे काम पत्करून पोलिसांची भूमिका निभावतात. प्रसंगी बाचाबाचीही होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नांदगावचे वळण पास करताना प्रसंगी १० ते १५ मिनिटे विलंब होतो. पर्यटकांना ही बाब क्लेशकारक वाटते. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम खात्याने नांदगाव बायपास तयार करून वाहतुकीची कोंडी सोडविण्यात सहकार्य करावे, अशी पर्यटकांची मागणी आहे. रस्ता रुंदीकरण केल्यास परिसराती वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल, अशी स्थानिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)

Web Title: No traffic bypass, due to no bias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.