Join us

शिवाजी महाराजांचे पुतळे छत्रविना ! 365 दिवस पुतळे झेलत आहेत ऊन-पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 8:37 AM

विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील व अंधेरी (पूर्व )सहार येथील मरोळ वेअर हाऊस येथील या शिवाजी महाराजांच्या दोन्ही पुतळ्याच्या डोक्यावर छत्रच नसल्यामुळे हे दोन्ही पुतळे 365 दिवस ऊन व पाऊस झेलत आहे.

- मनोहर कुंभेजकर

विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील व अंधेरी (पूर्व )सहार येथील मरोळ वेअर हाऊस येथील या शिवाजी महाराजांच्या दोन्ही पुतळ्याच्या डोक्यावर छत्रच नसल्यामुळे हे दोन्ही पुतळे 365 दिवस ऊन व पाऊस झेलत आहे. अंधेरी पूर्व मरोळ वेअर हाऊस येथील 2012 पासून येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि 2014 साली विलेपार्ले पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  छत्रविना आहेत.

लोकमतच्या वृत्ताची दखल घेत गेल्या 4 मार्च रोजी शिवसेनेने तिथीनुसार विलेपार्ले पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात दिमाखात शिवजयंती साजरी केली होती. यावेळी आपल्या भाषणात जर राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारणार नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र शिवसेना उभारेल अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती,मात्र 4 महिने उलटून गेले तरी अजून येथे उभारले गेले नाही अशी माहिती अॅड. वॉच डॉग फाऊंडेशनचे विश्वस्त ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

(विलेपार्ले व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याचा शिवसेना व भाजपाला पडला विसर !)

लोकमतने सातत्याने हा विषय मांडला असून लोकमतच्या बातमीची दखल घेत महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे अंधेरी (पूर्व) विधानसभेचे आमदार रमेश लटके यांनी देखिल हा विषय एका लक्षवेधी सुचनेद्वारे 2015 साली नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडली होती. मात्र अजून याची सरकारने  अंमलबजावणी केली नाही याबद्धल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि जर महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारले जात नसेल तर वॉच डॉग  फाउंडेशन व सहार गावातील शिवप्रेमी जनताच या दोन्ही पुतळ्यांच्या डोक्यावर छत्र उभारले अशी माहिती शेवटी पिमेटा व अल्मेडा यांनी दिली.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्र