नोबेल विजेते कैलास सत्यार्थी दिसणार 'क्राईम पेट्रोल'मध्ये
By admin | Published: January 14, 2015 06:24 PM2015-01-14T18:24:16+5:302015-01-14T18:24:16+5:30
शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी लवकरच टीव्हीवर प्रसारीत होणा-या 'क्राईम पेट्रोल सतर्क' या कार्यक्रमात दिसणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी लवकरच टीव्हीवर प्रसारीत होणा-या 'क्राईम पेट्रोल सतर्क' या कार्यक्रमात दिसणार आहेत.
विविध गुन्हेगारी घटनांवर प्रत्येक एपिसोडमधून प्रकाश टाकणा-या क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येते. बालमजुरी आणि मुलींची करण्यात येत असलेली तस्करी यावर आधारीत असलेल्या कार्यक्रमात सत्यार्थी हे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणार आहेत. कैलास सत्यार्थी यांनी आपल्या "बचपन बचाओ आंदोलन" या संस्थेमार्फत बाल मजुरीविरूध्द देशभरात काम केले आहे. सत्यार्थी यांनी अनेक संकटांचा सामना करीत हजारो बालमजुरांची सुटका केली आहे. कैलास सत्यार्थी बालमजुरीविरूध्द पुन्हा एकदा टिव्हीच्या माध्यमातून दिसणार असून बालमजुरीविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन ते यावेळी करताना दिसणार आहेत. येत्या २६ जानेवारी रोजी हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, भारताच्या कैलास सत्यार्थी व पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांना २०१४ चा शांततेचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.