‘Nobody does it Better’ मुंबई मेट्रो स्टेशनजवळच्या LED बोर्डवरचा मेसेज व्हायरल, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:38 PM2023-03-21T13:38:22+5:302023-03-21T13:45:14+5:30

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांनी एक अजबच घटना पाहिली. सध्या त्याचा मेसेज व्हायरल होत आहे.

Nobody does it Better message on LED board near Mumbai metro station goes viral see mumbai commuter spot naughty message Video | ‘Nobody does it Better’ मुंबई मेट्रो स्टेशनजवळच्या LED बोर्डवरचा मेसेज व्हायरल, Video

‘Nobody does it Better’ मुंबई मेट्रो स्टेशनजवळच्या LED बोर्डवरचा मेसेज व्हायरल, Video

googlenewsNext

Andheri LED Viral Video: मुंबईतून एक अजब प्रकार समोर आला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांनी एक अजबच घटना पाहिली. येथे नजीक असलेल्या एका डिजिटल एलईडी साईनबोर्डवर लिहिण्यात आलेला एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रणामात व्हायरल होत आहे. हा साईन बोर्ड कोणी लावला याची माहिती समोर आलेली नाही. परंतु याचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

यापूर्वीही अशा घटना
दरम्यान, डिस्प्ले बोर्डवर कोणी मेसेज बदलला आणि काय कारवाई सुरू करण्यात आलीये याची माहिती समोर आलेली नाही. परंतु अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वीही मार्च महिन्यात नवी मुंबईत एका स्पीड लिमिट साईन बोर्डवर एक अपमानास्पद मेसेज प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही वाहन चालकांनी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला. त्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली होती. तसंच त्या बोर्डाचा वीजपुरवठा बंद करून प्रकरणाचा तपास सुरू केला होता. 

आणखी एक प्रकरण व्हायरल
यावर्षी जानेवारी महिन्यात हाजी अली लोटर जंक्शननजीक अशाप्रकारच्या घटनेची माहिती मिळाली होती. डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि नो स्मोकिंगसारख्या मेसेजेसना बदलण्यात आलं होतं. दरम्यान, यात बनावट पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक एलईडी बोर्ड सिस्टममध्ये टेक्निकल बदल करत मेसेजेस बदलण्यात आल्याचं एका खासगी कंपन्यांच्या सुपरव्हायझरनं सांगितलं होतं. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातही पवई सारख्या ठिकाणाहून अशा प्रकारच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Web Title: Nobody does it Better message on LED board near Mumbai metro station goes viral see mumbai commuter spot naughty message Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई