Join us

‘...माझी काळजी कोणीच करीत नाही’

By admin | Published: February 29, 2016 3:29 AM

हसनैन वरेकर याच्या सोशल मीडियावर फारच मर्यादित अशा खाणाखुणा असताना. त्याने गुगल प्लस अकाऊंटवर ‘लव्ह स्टेट्स’ पोस्ट केले होते.

डिप्पी वांकाणी,  मुंबईहसनैन वरेकर याच्या सोशल मीडियावर फारच मर्यादित अशा खाणाखुणा असताना. त्याने गुगल प्लस अकाऊंटवर ‘लव्ह स्टेट्स’ पोस्ट केले होते. त्यात त्याने ‘मी खूप काळजी घेतल्यानंतरही माझी मात्र कोणीच काळजी करीत नसल्याचे’, म्हटले होते. वरेकरने फेसबुकवर प्रोफाईल पिक्चरही टाकलेले नव्हते. त्याच्या अकाऊंटवर २१ मित्र जोडले (कनेक्ट) गेलेले होते. हसनैनला हॅकिंगमध्ये गोडी होती व त्याला हॅकिंगशी संबंधित दोन पाने आवडलीही होती. तो फेसबुकवरील एकाच ग्रुपचा सदस्य होता व हा ग्रुप इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करायचा. वरेकरने गुगलवर मजकूर असलेले चित्र पोस्ट केले होते. त्या मजकुरात म्हटले होते की, ‘तुम्ही काहीच काळजी करीत नसताना मी आणखी किती काळजी करावी हे काही मला समजत नाही.’ तथापि, त्याने हा संदेश नेमका कोणाला उद्देशून लिहिला याचा उल्लेख केला नाही. ही एकचपोस्ट त्याने त्या संकेतस्थळावर दिली होती. हसनैनने २०१०मध्ये कधीतरी फेसबुक जॉईन केले होते. त्याचे फेसबुक अकाऊंट तेव्हापासून सक्रिय नव्हते. २१ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने फेसबुकवर त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी पोस्ट केली. त्यात त्याने मी मुंबईतील अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू हायस्कूलमध्ये व नंतरचे शिक्षण मुंबई विद्यापीठात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर फक्त एकदाच नेटवर्किंग साईटवर पोस्ट केली होती तीही २९ जुलै २०१५ रोजी. ‘सबवे सर्फर्स’ खेळण्यासाठी मित्रांना केलेले निमंत्रण होते. वरेकरचे बहुतेक मित्रही त्याच्या आडनावाचेच आणि काही जण बहुराष्ट्रीय कंपन्यांत कामाला होते. वरेकरला हॅकिंगची कामे करण्यात गोडी होती व त्याने फेसबुकवर दोन पानांना लाईक केले होते. ती पाने होती ‘गेम हॅक्स् अँड चिट्स’ आणि ‘हॅकर्स युनिव्हरसिटी’. वरेकरने त्याचा किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाचे छायाचित्र फेसबुकवर टाकले नाही कीकधी त्याने त्याच्या कोणत्याही मित्राच्या पोस्टवर आपले मत व्यक्त केले नाही.