गणेशोत्सव परवानग्यांबाबत नोडल आॅफिसरच अनभिज्ञ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:49 AM2018-08-21T04:49:26+5:302018-08-21T04:53:56+5:30
गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या आॅनलाइन परवानग्यांबाबत मुंबई महापालिकेचे नोडल आॅफिसरच अनभिज्ञ असल्याचा गंभीर आरोप बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी केला आहे.
मुंबई : गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या आॅनलाइन परवानग्यांबाबत मुंबई महापालिकेचे नोडल आॅफिसरच अनभिज्ञ असल्याचा गंभीर आरोप बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी केला आहे. वारंवार मनपाचा आॅनलाइन परवानगीचा सर्व्हर बंद पडत असल्याने मुंबईत गणेशोत्सव मंडळ आणि मनपामध्ये वाद निर्माण झाल्याचे दहीबावकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅनलाइन परवानगीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दहीबावकर म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी धोरण आखले आहे. त्याचे पालन करत रस्त्याशेजारी मंडप उभारताना वाहतुकीसाठी पादचाºयांना मार्ग देण्यात येत आहे. याशिवाय पर्यायी मार्गाची माहितीही मंडळांनी दिलेली आहे. मात्र आॅनलाइन परवानग्यांसाठी गेले असताना सर्व्हर डाऊन असल्याने कागदपत्र अपलोडच होत नसल्याच्या तक्रारी मंडळांमधून येत आहेत. गणेशोत्सव मंडळ आणि मनपा व पोलिसांत कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून नुकतीच पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यात नियमानुसार पोलिसांकडून परवानग्यांसाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी आश्वासित केले आहे. याशिवाय गरज पडल्यास मनपा कार्यालयात जाऊन पोलीस अधिकारी मंडळांना परवानगी मिळवून देण्यास सहकार्य करतील, असे आयुक्तांनी आश्वासित केल्याचा दावा दहीबावकर यांनी केला आहे.
नायगाव येथील पोलीस सभागृहात पार पडलेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी गतवर्षी ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या गणेशोत्सव मंडळांना तत्काळ परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेंतर्गत आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी तत्काळ परवानगी देण्याचे ठरले आहे. एकंदरीतच गेल्या कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजºया करणाºया मंडळांची अडवणूक नोडल आॅफिसर करीत असल्याने वाद निर्माण होत असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे. परिणामी, मनपाने नोडल आॅफिसरला प्रशिक्षित करून गतवर्षी परवानगी दिलेल्या मंडळांना तत्काळ परवानगी देण्याची मागणी समितीने केली आहे.
मंडपाच्या परवानगीचा संथ कारभार; गणेशोत्सव मंडळ हवालदिल
मंडपासाठी आवश्यक विविध परवानग्यांसाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडे धावाधाव करण्याचा त्रास वाचण्यासाठी महापालिकेने आॅनलाइन पद्धत आणली़ मात्र या पहिल्याच प्रयोगाने मंडळांच्या अडचणीत कमालीची भर पडली आहे़ परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडळांपैकी जेमतेम पाच टक्क्यांनाच मंडपासाठी हिरवा कंदील मिळाला आहे़ या परवानगीशिवाय मंडपच उभारता येत नसल्याने देखावे, सजावटींना यंदा कात्री लागणार आहे़
महापालिकेबरोबरच स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल अशा विविध यंत्रणांकडून परवानगी मिळविण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने आॅनलाइनच्या माध्यमातून एक खिडकी योजना राबविण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली होती़ त्यानुसार या वर्षीपासून महापालिकेने ही पद्धत सुरू केली आहे़ यासाठी विभाग कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे़
आतापर्यंत सुमारे नऊशे मंडळांच्या अर्जांपैकी केवळ ११० जणांना मंडपाची परवानगी मिळाली आहे़ उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार या मंडळांना महापालिकेमार्फत परवानगी देण्यात येत आहे़ मात्र या वर्षी आधी परवानगी, नंतर मंडप असे धोरण महापालिकेने अवलंबिले आहे़ त्यामुळे मंडळांचे नियोजन बिघडले आहे़ त्यात परवानगीची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने गणेशोत्सव मंडळे हवालदिल झाली आहेत़ या मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी लेखी अर्ज घेऊन त्यानंतर आॅनलाइन प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे, पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले़
येथील अर्ज रेंगाळले
सर्वाधिक गणेशोत्सव मंडळे असलेल्या गिरगावातून सुमारे शंभर अर्ज आले आहेत़ यापैकी केवळ २१ मंडळांना आतापर्यंत परवानगी मिळाली आहे़ तर गजबजलेल्या दादर विभागातून आलेल्या ५८ अर्जांपैकी केवळ एका मंडळाला परवानगी मिळाली आहे़
या मंडळांच्या अडचणींत वाढ
रस्त्यावर व वाहतुकीस अडथळा ठरणाºया मंडळांना मंडपासाठी परवानगीची सक्ती करण्यात आली आहे़
मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची रुंदीही कमी केली आहे़ याचा फटकाही गणेश मंडळांना बसत आहे़
आतापर्यंत परवानगी मिळेपर्यंत मंडप उभारून देखावे व सजावटीला मंडळांना वेळ मिळत होता़ या वर्षी महापालिकेने परवानगीपूर्वी मंडप दिसल्यास ते बेकायदा ठरविण्यास सुरुवात केली आहे़
५ टक्के मंडळांना परवानगी
सुमारे २२०० मंडळांकडून दरवर्षी महापाालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात येतो़ मात्र या वर्षी वाहतुकीला अडथळा ठरणाºया मंडळांना परवानगी नाकारण्यात येत आहे़ आतापर्यंत ३९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत़ तसेच केवळ १०८ जणांना परवानगी मिळाली आहे़