नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाची दारे विद्यार्थ्यांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:07 AM2018-07-20T03:07:11+5:302018-07-20T03:08:22+5:30
अकरावीची दुसरी यादी जाहीर; कटआॅफ नव्वद टक्क्यांपुढेच
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. पहिल्या यादीत १ लाख २० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर गुरुवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत ७० हजार ६३ विद्यार्थ्यांना जागा अलॉट करण्यात आल्या. अनेक नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ दुस-या यादीतही नव्वदीपार राहिला, तर काही महाविद्यालयांच्या जागा पूर्ण भरल्याने प्रवेश बंद करण्यात आले आहेत.
दुस-या गुणवत्ता यादीतही विद्यार्थ्यांचा अधिक कल कॉमर्सकडे दिसून आला. तर, महाविद्यालयांचा कटआॅफ मात्र केवळ १ ते २ टक्क्यांनीच खाली आला आहे. त्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांनाही नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही.
दुसºया यादीत १५,३८१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळणाºया विद्यार्थ्यांची संख्या १०,९५४ आहे. दुसºया यादीवरही कॉमर्स शाखेकडे कल असणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ४४,०५० विद्यार्थ्यांनी कॉमर्सला पसंती दिली असून त्यातील ७,६५३ विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. कलेच्या २७७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे तर ४,३५९ विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेसाठी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी १९ ते २१ जुलैदरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे.
महाविद्यालयांची कटआॅफ यादी
जयहिंद कॉलेज
आर्ट्स - जागा उपलब्ध नाही
कॉमर्स - ९१. २ %
सायन्स - ६६. ६ %
के.सी. कॉलेज
आर्ट्स - ८३%
कॉमर्स - ९१. ४%
सायन्स - जागा उपलब्ध नाही
सेंट झेव्हिअर्स
आर्ट्स - ९३. ८ %
कॉमर्स - जागा उपलब्ध नाही
सायन्स -८८. १६%
हिंदुजा कॉलेज
आर्ट्स -जागा उपलब्ध नाही
कॉमर्स -८७. ८ %
सायन्स - जागा उपलब्ध नाही
वझे-केळकर कॉलेज
आर्ट्स - ८६%
कॉमर्स - ९०. ४ %
सायन्स - ९१. ८ %
आर.ए. पोद्दार कॉलेज
कॉमर्स - ९२ %
रूपारेल कॉलेज
आर्ट्स - ८६%
कॉमर्स - ८९. २ %
सायन्स - ९०. २ %
रुईया कॉलेज
आर्ट्स - (इंग्रजी माध्यम)- ९१. ६ %
सायन्स - ९१. ७%