मुंबई उपनगर जिल्ह्यात १०९ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे सादर  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:27 PM2019-04-09T21:27:54+5:302019-04-09T21:28:31+5:30

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ करिता नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ६७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत.

Nomination of 109 candidates in Mumbai Suburban District | मुंबई उपनगर जिल्ह्यात १०९ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे सादर  

मुंबई उपनगर जिल्ह्यात १०९ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे सादर  

Next

मुंबई,  :सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ करिता नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ६७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. यानुसार आजपर्यंत १०९ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली असून प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी १० एप्रिल २०१९ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धी माध्यम कक्षाद्वारे  देण्यात आली आहे.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून आज १२ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २२ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून आज १८ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून आज २३ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण ३३ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. तसेच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून १४ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत.

Web Title: Nomination of 109 candidates in Mumbai Suburban District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.