Join us

मुंबई विद्यापीठावर सनदी प्रशासक नेमा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:40 AM

मुंबई विद्यापीठातील गोंधळ दूर करण्याकरिता प्रशासकपदी एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाºयाची नियुक्ती करण्याची मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळ दूर करण्याकरिता प्रशासकपदी एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाºयाची नियुक्ती करण्याची मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केली.हॉटेल, मॉल, औषधांची दुकाने रात्रभर सुरू ठेवण्याचे विधेयक विधिमंडळाच्या उभय सभागृहांत मंजूर झाल्याबद्दल ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. युवासेनेने ही मागणी केली होती. त्या वेळी ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना रजेवर पाठवले असून, त्यांचा कार्यभार अन्य व्यक्तींकडे दिला आहे. मात्र विद्यापीठातील घोळ निस्तरण्याकरिता प्रशासक नियुक्त करणे गरजेचे असून, तो आयएएस किंवा आयपीएस अधिकारी असावा.रात्री दुकाने सुरू करायला परवानगी दिल्याने मुंबईकरांची भूक चोवीस तास भागवणे शक्य होईल. २०१६मध्ये केंद्र सरकारने याबाबत कायदा केला व आता राज्यानेही कायदा केल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. अनिवासी भागातही हॉटेल, मॉल्स व औषधांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.