शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:36 AM2020-08-16T01:36:24+5:302020-08-16T01:36:32+5:30

अखेर सहा वर्षांच्या लढ्यानंतर या हजारो शिक्षकेतर कर्मचाºयांना न्याय मिळाला आहे. या कर्मचाºयांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Non-teaching staff will get the benefit of seniority | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार

Next

मुंबई : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. यानुसार शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीही देण्यात आली. मात्र पालिकेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या वरिष्ठ श्रेणीपासून दूर ठेवले होते. अखेर सहा वर्षांच्या लढ्यानंतर या हजारो शिक्षकेतर कर्मचाºयांना न्याय मिळाला आहे. या कर्मचाºयांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तो पालिकेनेही लागू केला. हा वेतन आयोग लागू करताना शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ तत्काळ देण्यात आला होता. मात्र पालिकेशी संलग्लित खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाºयांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते. शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी असेलली ही पदे मर्यादित असल्याने त्यांना पदोन्नती मिळत नाही. अशा वेळी त्यांना १२ वर्षे सेवाकाळ पूर्ण झाल्यावर पहिली वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. तर २४ वर्षे पूर्ण झाल्यावर दुसरी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. सहाव्या वेतन आयोगानुसार पालिकेने या कर्मचाºयांना ही वेतनश्रेणी लागू केली नव्हती. यामुळे हे सर्व कर्मचारी त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहिले होते. या निर्णयामुळे २००५ पासून वेतन निश्चिती होणार असून २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना वेतनात दहा ते बारा हजार रुपयांची वाढ होईल़

Web Title: Non-teaching staff will get the benefit of seniority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.