Join us

भाजपाच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:08 AM

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करेल व सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

मुंबई : निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करेल व सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.समाजात शांतता, सलोखा, बंधुत्वाची भावना कायम राखण्यास काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक उपवास करण्यात आला. खा. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपवास केला.परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या जातीयवादी भूमिकेवर टीका केली. भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर हल्ले केले जात आहेत. जातीय दंगलींमध्ये भाजपा आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. भीमा कोरेगाव सारख्या घटना घडवून मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचे काम स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे, असे चव्हाण म्हणाले.माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूर येथे, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात नाशिकला, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात यवतमाळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात पुणे, नागपूर येथे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे उपोषण करण्यात आले. सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने हुतात्मा चौक येथे सुरू असलेल्या उपोषणास दुपारी राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यासपीठावर हजेरी लावीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन नमस्कार केला़>मुंबईतही सामूहिक उपवासमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत माजी खा. मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुरेश शेट्टी, वर्षा गायकवाड, नसीम खान व मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव आदी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक एकदिवसीय उपवास केला.