जी उत्तर विभाग साजरा करणार अनोखा जागतिक पर्यावरण दिन, ४ जून  रोजी काढणार 'इको वॉक' रॅली

By मनोहर कुंभेजकर | Published: May 31, 2023 07:57 PM2023-05-31T19:57:49+5:302023-05-31T19:58:02+5:30

महानगरपालिका जी उत्तर विभाग अनोखा तीन दिवसीय जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहे.

North Division will celebrate the unique World Environment Day by organizing an 'Eco Walk' rally on June 4. | जी उत्तर विभाग साजरा करणार अनोखा जागतिक पर्यावरण दिन, ४ जून  रोजी काढणार 'इको वॉक' रॅली

जी उत्तर विभाग साजरा करणार अनोखा जागतिक पर्यावरण दिन, ४ जून  रोजी काढणार 'इको वॉक' रॅली

googlenewsNext

मुंबई- महानगरपालिका जी उत्तर विभाग अनोखा तीन दिवसीय जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहे. या दि,४ जून  रोजी पर्यावरण जनजागृतीसाठी इको वॉक ’ रॅली काढणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दि. २, ३ व ४ जून २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग आणि बिट्स अँड बाईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण इको उत्सव’ माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारकाच्या मागील जागेत, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (प), या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे.दि. ४ जून  रोजी, पर्यावरण जनजागृतीसाठी, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ‘इको वॉक ’ या शीर्षकाअंतर्गत पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिना निमित्त
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि,-२ व दि,३ जून रोजी इको वर्कशॉप्स मध्ये फेस पेंटिंग, घोषवाक्य निर्मिती, वृत्तपत्र व प्लास्टिक बाटल्यांमधून वेस्ट मॅनेजमेंटची निर्मिती  पथनाट्य आदीं पर्यावरण विषयक विविध उपक्रमांचे  सादरीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे दि. ४ जून  रोजी, पर्यावरण जनजागृतीसाठी, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ‘इको वॉक ’ या शीर्षकाअंतर्गत पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक येथे सुरू होऊन माहीम येथील, लेडी जमशेदजी रोड, राजा बढे चौक येथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर - माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक असा या रॅलीचा मार्ग असेल.जी उत्तर विभागाचे घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता काझी इरफान अहमद व बिट्स अँड बाईट्सच्या अध्यक्ष विद्या बारस्कर यांनी ही माहिती दिली.

समाजाप्रती आपले योगदान देण्याच्या उद्देशाने सुरू केलेले बिट्स अँड बाईट्स( इन्फोटेनमेन्ट अँड अवेअरनेस डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म)  हे दादर स्थित एक डिजिटल माध्यम आहे. या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीच्या उद्देशाने नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्लॅस्टिक एकत्री करण या उपक्रमा अंतर्गत सोसायटी, सभागृहे, समुद्रकिनारे, मैदाने अशा अनेक ठिकाणचे प्लॅस्टिक एकत्र करून ते रिसायकलिंगसाठी पाठविले जाते अशी माहिती विद्या बारस्कर यांनी दिली.

Web Title: North Division will celebrate the unique World Environment Day by organizing an 'Eco Walk' rally on June 4.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.