Join us

हुकमी मतदार ठरवणार ईशान्य मुंबईचा चेहरा, मतदारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:15 AM

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पश्चिम विधानसभा या भागातील मतदारांमुळे ईशान्य मुंबईचा चेहरा बदलू शकतो.

- मनीषा म्हात्रेउत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पश्चिम विधानसभा या भागातील मतदारांमुळे ईशान्य मुंबईचा चेहरा बदलू शकतो. भाजपाला नाराज, तर कॉंग्रेसला वैतागलेला हा मतदार कुणाच्या दिशेने कौल देतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.२००९ च्या पुनर्रचनेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या विभाजनातून हा मतदारसंघ तयार झाला. जवळपास अडीच लाखाहून अधिक मतदार येथे आहेत. संमिश्र लोकवस्ती असलेल्या या विधानसभा मतदारसंघात सुमारे ८० टक्के मराठी मतदारांचे प्राबल्य आहे. यापूर्वीचे पालिका प्रभागही विभागले गेले आहे.भटवाडी, विद्याविहार, पार्कसाईट, असल्फा आदी भाग या मतदार संघात येत आहे. प्राथमिक नागरी सोयीसुविधांचा अभाव, एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणाचा गुंडाळलेला प्रस्ताव त्यामुळे होणारी वाढती वाहतूक कोंडी, अशा समस्या नागरिकांना भेडसावताहेत. घाटकोपर- वर्सोवा मेट्रोमुळे येथील वाहतूक कोंडीतून थोडाफार दिलासा मिळाला. मात्र ही समस्या पूर्णत: संपलेली नाही. आमदार जरी, काम केल्याचा दावा करत असले तरी, आमदारांनी फक्त अध्यात्मिक कामे केली. जनतेच्या खऱ्या समस्यांकडे त्यांनी लक्षच दिले नसल्याचा आरोप विरोधक करताहेत.कॉंग्रेस, शिवसेना, मनसे नंतर मोदी लाटेत भाजप उमेदवाराने या मतदारसंघात कमळ फुलवले. मनसेच्या तिकीटावर राम कदम यांना ६०,३४३ मते मिळाली, तर भाजपच्या पुनम महाजन यांना ३४, ११५ मतांवर समाधान मानावे लागले. या लक्षवेधी मतदारसंघात राम कदम यांनी बाजी मारली. मनसे लाट ओसरल्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कदमांनी भाजपात प्रवेश करत, निवडणूक लढवली. ते ८० हजार ३४३ मते मिळवून ते पुन्हा विजयी झाले. यात, शिवसेनेचे सुधीर मोरे दुसºया तर मनसेचे दिलीप लांडे तिसºया क्रमांकावर फेकले गेले. या विधानसभेत सेनेचे नगरसेवक अधिक आहेत. तर मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविकेने सेनेत प्रवेश केला होता.विकास कामांपेक्षा या भागातील लोकांना देवदर्शन घडवून आणण्यात तसेच दहीहंडी सारखे सार्वजनिक उपक्रम राबविणारे आमदार अशी ओळख असलेल्या कदमांना याच कार्यक्रमादरम्यानच्या बेताल वक्तव्यामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली. गोविंदांशी संवाद साधत असताना, 'लग्नासाठी मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार'; असे गोविंदांना आश्वासन देत, त्यांचा मोबाइल क्रमांकही यावेळी दिला. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका झाल्या.त्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्या बद्दल संताप आहे. तसेच मोदी लाटेचे वारेही या भागातून दिसेनासे झाले आहेत.राजकीय घडामोडीमनसेतून भाजपात उडी घेत मोदी लाटेत निवडून आलेल्या आमदार राम कदम यांचे दहिहंडीदरम्यान ’मुली पळवा’ या वक्तव्यानंतर, त्यांच्याकडे बघण्याचा दष्टीकोन बदलला. त्यामुळे भाजपाबद्दल या भागात नाराजीचे सूर उमटत आहेत.भाजपावर नाराजी आणि कॉंग्रेसला वैतागलेल्या या भागात बहुजन विकास आघाडीचा चेहरा मते खेचू शकतो. त्याला मानणारा वर्ग या भागात अधिक आहे. मात्र तो उमेदवार कोण असेल यावर या मतांचे विभाजन अवलंबून आहे.

टॅग्स :मुंबईघाटकोपरलोकसभा निवडणूक