उत्तर भारतीय भाजपावर नाराज

By admin | Published: April 9, 2015 04:57 AM2015-04-09T04:57:56+5:302015-04-09T04:57:56+5:30

संपूर्ण देशासह नवी मुंबईतील उत्तर भारतीयांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरून मते दिली. विधानसभा निवडणुकीत

North Indian BJP angry | उत्तर भारतीय भाजपावर नाराज

उत्तर भारतीय भाजपावर नाराज

Next

नवी मुंबई : संपूर्ण देशासह नवी मुंबईतील उत्तर भारतीयांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरून मते दिली. विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रेंच्या विजयानंतर शहरातील अनेक उत्तर भारतीयांनी भाजपात प्रवेश करून पक्ष वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले. परंतु महापालिका निवडणुकीत एकाही हिंदी भाषिक इच्छुक उमेदवारास पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या नवी मुंबईतील उत्तर भारतीयांनी मंगळवारी वाशी येथील भाजपा कार्यालयात जाऊन आमदार मंदा म्हात्रेंसह जिल्हा अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी यांना जाब विचारला.
श्रेष्ठींनी उमेदवारांची लिस्ट फायनल केली आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. मात्र निवडणुकीनंतर परिवहन, प्रभाग समित्यांवर तुमची वर्णी लावू, असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. याने समाधान न झाल्याने त्यांनी वाशीत हिंदी भाषा सेवा समितीच्या नेतृत्वाखाली तातडीची बैठक घेऊन महापालिका निवडणुकीत भाजपावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

Web Title: North Indian BJP angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.