‘साडेचार वर्षांत उत्तर भारतीयांना धमक्या नाहीत’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:28 AM2019-01-25T06:28:51+5:302019-01-25T06:29:07+5:30

उत्तर प्रदेश ही जन्मभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी वनवासातील १४ वर्षे नाशिकच्या पंचवटीत घालवली.

North Indians do not have threats in four and a half years | ‘साडेचार वर्षांत उत्तर भारतीयांना धमक्या नाहीत’

‘साडेचार वर्षांत उत्तर भारतीयांना धमक्या नाहीत’

Next

मुंबई : उत्तर प्रदेश ही जन्मभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी वनवासातील १४ वर्षे नाशिकच्या पंचवटीत घालवली. यूपी आणि महाराष्ट्राचा हजारो वर्षांचा संबंध आहे. मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. यापूर्वी उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार घडत. परंतु, साडेचार वर्षे आपल्या सरकारच्या कामगिरीमुळे त्यांना कोणी धमकावले नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांताक्रुझ येथे उत्तर भारतीय स्थापना दिन मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. ३१ वर्षांपासून उत्तर प्रदेश दिन आयोजित करणाऱ्या भाजपा मुंबई सरचिटणीस अमरजीत मिश्र यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या वेळी उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी राम नाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आज सकाळीच लखनऊ येथे उत्तर भारतीय स्थापना दिवस साजरा केला. आता सायंकाळी आम्ही उत्तर भारतीय स्थापना दिवस साजरा करण्यासाठी मुंबईत आल्याचे आदित्यनाथ योगी यांनी सांगितले. राम नाईक यांनी गेल्या साडेचार वर्षात उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून केलेल्या कामगिरीची त्यांनी माहिती दिली. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनी आपली मातृभूमी असलेल्या उत्तर प्रदेशा विसरू नका. तुमचे स्किल उत्तर प्रदेश मध्ये आणा आणि उत्तर प्रदेश सर्वोत्तम बनवा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: North Indians do not have threats in four and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.