उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोपाळ शेट्टी 118811 मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:02 PM2019-05-23T12:02:47+5:302019-05-23T12:03:50+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना 180579 मते मिळाली आहेत.

North Mumbai Lok Sabha Election 2019 Result: Gopal Shetty leads the 118811 votes | उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोपाळ शेट्टी 118811 मतांनी आघाडीवर

उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोपाळ शेट्टी 118811 मतांनी आघाडीवर

Next

मुंबईः  2014च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा तब्बल 4 लाख 46 हजार 582 मतांनी पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे काँग्रेसनं अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिच्या रूपानं तगडं आव्हान उभं केलं आहे. ऊर्मिलानं धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली होती. त्यामुळे इथल्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना 180579 मते मिळाली आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांच्या पारड्यात 61768 मतं मिळाली आहेत. गोपाळ शेट्टी यांनी 118811 मतांनी आघाडी घेतली आहे. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 83 हजार, 870 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 60 टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का जास्त आहे. ही मतं कुणाच्या पारड्यात जातात, हे पाहावं लागेल.  गेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना 6 लाख 64 हजार 004 मतं मिळाली होती, तर संजय निरुपम यांना 2 लाख 17 हजार 422 मतांपर्यंतच मजल मारता आली होती.

Web Title: North Mumbai Lok Sabha Election 2019 Result: Gopal Shetty leads the 118811 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.