नोटाबंदीचा हॉटेल्स उद्योगांना फटका
By admin | Published: December 24, 2016 03:38 AM2016-12-24T03:38:40+5:302016-12-24T03:38:40+5:30
नोटाबंदीचा हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला असून, ऐन नव वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर २००८ पासून आता कमी
Next
मुंबई : नोटाबंदीचा हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला असून, ऐन नव वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर २००८ पासून आता कमी व्यवसाय होईल, अशी भीती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नोटाबंदीनंतर या वर्षी बुकिंगही रद्द होत असून, चौकशीचे दूरध्वनी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदी झाल्यापासून एका महिन्याच्या कालावधीत हॉटेलच्या बुकिंगमध्ये मोठा फरक दिसून आला आहे. पहिल्या दोन आठवड्यांत रेस्टॉरंट आणि फूड अँड बेव्हरेज युनिटसवर परिणाम झाला आहे. परदेशी करण्यात आलेली बुकिंगही रद्द होत आहेत. (प्रतिनिधी)