Sanjay Raut vs Kirit Somaiya: '५८ नव्हे, १४० कोटी...गडबड ही गडबड हैं!', राऊतांचा नवा दावा; सोमय्यांचं जुनं ट्विटच दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:00 PM2022-04-08T13:00:28+5:302022-04-08T13:01:07+5:30

Sanjay Raut vs Kirit Somaiya: 'आयएनएस विक्रांत'चं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी मुंबईकरांकडून जमा केलेला निधी लाटल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर आज किरीट सोमय्या यांनी आपण फक्त ३५ मिनिटं प्रतिकात्मक निधी जमा केला होता, असं स्पष्टीकरण दिलं.

Not 58 its 140 crores sanjay raut shows old tweet of kirit somaiya about ins vikrant isuue | Sanjay Raut vs Kirit Somaiya: '५८ नव्हे, १४० कोटी...गडबड ही गडबड हैं!', राऊतांचा नवा दावा; सोमय्यांचं जुनं ट्विटच दाखवलं

Sanjay Raut vs Kirit Somaiya: '५८ नव्हे, १४० कोटी...गडबड ही गडबड हैं!', राऊतांचा नवा दावा; सोमय्यांचं जुनं ट्विटच दाखवलं

googlenewsNext

Sanjay Raut vs Kirit Somaiya: 'आयएनएस विक्रांत'चं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी मुंबईकरांकडून जमा केलेला निधी लाटल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर आज किरीट सोमय्या यांनी आपण फक्त ३५ मिनिटं प्रतिकात्मक निधी जमा केला होता, असं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर काहीच मिनिटात संजय राऊत यांनी सोमय्यांचं जुनं ट्विट शोधून काढलं आणि त्याचा दाखला देत नवा आरोप केला आहे. 

"मैने तो ५८ करोड का हिसाब मांगा था...बात १४० करोड तक पहुंच गयी...क्रोनोलॉजी को समज लिजिये. प्यारे देश भक्तो...गडबड ही गडबड हैं...", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. यात राऊत यांनी सोमय्या यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी केलेलं एक ट्विट जोडलं आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेऊन आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी आणि या जहाजाचं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी मुंबईकर १४० कोटी रुपये देण्यासाठी तयार आहेत, असं म्हटलं आहे. 

सोमय्या काय म्हणाले?
आयएनएस विक्रांत युद्धनौकेचं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी जनवर्गणी गोळा करुन ती राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. पण माहितीच्या अधिकारातून असा कोणताही निधी राजभवनात पोहोचलेला नाही अशी माहिती समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देत आज किरीट सोमय्या यांनी आपण त्यावेळी फक्त प्रतिकात्मक पद्धतीनं केवळ ३५ मिनिटं निधी जमा केला होता, असं म्हटलं आहे. 

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा सोमय्यांचा डाव- राऊत
मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही अमराठी धनाड्य लोक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

Web Title: Not 58 its 140 crores sanjay raut shows old tweet of kirit somaiya about ins vikrant isuue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.