Join us

सर्वच आमदार श्रीमंत नाहीत; त्यामुळे घरं बांधून दिली त्यात गैर काय?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:33 AM

मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई- सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. मात्र, मनसेसह अनेकानी या निर्णयाला विरोध केला आहे. 

मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. तर, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हा खर्च कुणाच्या सांगण्यावरुन, असा सवाल विचारला आहे. एकूणच आमदारांच्या घरांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयावरुन गोंधळ उडाला असून सर्वसामान्यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. 

शिवसेनेच्या नेत्या महाविकास आघाडी सरकारने आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावरून जनतेतून विविध प्रतिक्रिया येत असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या मुद्द्याचे समर्थन केले आहे. सर्वच आमदार श्रीमंत नाहीत. काही ठराविक आमदारच श्रीमंत आहे. त्यामुळे गरीब आमदारांना घरे बांधून दिली तर त्यात गैर काय, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. 

आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार-

''नेमकं सरकारला साध्य काय करायचंय? की तुमचं सरकार डळमळीत होतंय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे? मुळात या प्रकाराची गरज काय? जनतेच्या पैशाच्या जीवावर मजा लुटणारे तुम्ही कोण? यासाठी सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्यानंतरच यावर निर्णय घ्यावा. जनता सूज्ञ आहे. जनता नक्कीच याला विरोध करेल'', असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. 

मोफत घरांपेक्षा 200 युनिट वीज मोफत द्या-

मनसेच्या आमदाराने ठाकरे सरकारला 'कामाचा' सल्ला दिला आहे. राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आमदारांना मोफत घरे कशासाठी?" असं म्हणत निशाणा साधला. "आमदारांना मोफत घरे कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा" असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडी