गेममुळे नाही, अभ्यासाला कंटाळून सोडले घर, नेपाळ सीमेवरून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:37 AM2017-11-11T06:37:53+5:302017-11-11T06:38:18+5:30

गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील मुलाच्या वृत्ताने सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या. मात्र गेममुळे नाही, तर अभ्यासाला कंटाळून त्याने घर सोडल्याची धक्कादायक माहिती मुलाच्या चौकशीतून उघड झाली आहे

Not because of the game, the home of the study turned away from the border, Nepal border | गेममुळे नाही, अभ्यासाला कंटाळून सोडले घर, नेपाळ सीमेवरून ताब्यात

गेममुळे नाही, अभ्यासाला कंटाळून सोडले घर, नेपाळ सीमेवरून ताब्यात

Next

मुंबई : गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील मुलाच्या वृत्ताने सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या. मात्र गेममुळे नाही, तर अभ्यासाला कंटाळून त्याने घर सोडल्याची धक्कादायक माहिती मुलाच्या चौकशीतून उघड झाली आहे. त्याला नेपाळच्या सीमेवरून गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.
‘मी चूक करतोय, पण मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, माझा मृत्यू झालाय असे समजा, अशा आशयाची चिठ्ठी लिहून २९ आॅक्टोबरपासून घर सोडलेल्या गोवंडीतील मुलाने सर्वांचीच झोप उडविली. त्याचे वडील वृत्तवाहिनीवर उच्च पदावर आहेत. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. आॅनलाइन गेमची आवड असलेल्या या विद्यार्थ्याचा लॅपटॉप पोलिसांनी तपासला तेव्हा डार्क नेटवरून डाऊनलोड केलेला सॅड सॅटन गेम तो खेळत असल्याचे आढळले. या गेममध्ये तीन टप्पे असून तिसरा टप्पा जिवावर बेतणारा ठरू शकतो, अशी माहिती पुढे आल्याने पोलीसही चक्रावले. गुन्हे शाखेसह राज्य दहशतवादविरोधी पथकही कामाला लागले.
शोध सुरू असताना तीन दिवसांपूर्वी या मुलाने त्याच्या मैत्रिणीला फोन केला. त्या फोनची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तेव्हा तो नेपाळ सीमेवर असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ नेपाळ गाठले आणि मुलाला ताब्यात घेतले. मुलाकडे केलेल्या चौकशीत त्याने गेमच्या नादात नाही, तर अभ्यासाचा कंटाळा, त्यात येणारी परीक्षा याला कंटाळून घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या सर्वांपासून सुटका करण्यासाठी त्याने १५ हजार रुपये आणि मोबाइल घेऊन घर सोडले. त्याने नवीन मोबाइल घेतला. मात्र याबाबत कुणाला माहिती नव्हते. जवळचे पैसे संपल्याने त्याने मदतीसाठी मैत्रिणीला फोन केला आणि याच फोनमुळे त्याच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ उलगडले.

Web Title: Not because of the game, the home of the study turned away from the border, Nepal border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.