आतापासून केमिस्ट नव्हे; तर फार्मसी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:41 AM2019-04-19T05:41:03+5:302019-04-19T05:41:18+5:30

बऱ्याच वर्षांपासून सुरू असणा-या राष्ट्रीय पातळीवरील फार्मासिस्टच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

Not chemist from now on; Then the pharmacy | आतापासून केमिस्ट नव्हे; तर फार्मसी

आतापासून केमिस्ट नव्हे; तर फार्मसी

googlenewsNext

मुंबई : बऱ्याच वर्षांपासून सुरू असणा-या राष्ट्रीय पातळीवरील फार्मासिस्टच्या लढ्याला अखेर यश आले आहे. लवकरच औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्यात नवी तरतूद होणार असून त्यानुसार आता ‘केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट’ असे न लिहिता यापुढे ‘फार्मसी’ असे लिहिण्यात येणार आहे. या नव्या तरतुदीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही महिन्यांत ही सुधारणा होईल.
भविष्यात औषधांच्या दुकानांवर तुम्हाला ‘केमिस्ट आणि ड्रगिस्ट’ऐवजी ‘फार्मसी’ असे लिहिलेले दिसणार आहे. कर्नाटक स्टेट रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनकडून औषधांच्या दुकानांवर ‘फार्मसी’ लिहिण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार औषधविषयक सल्लागार समितीने सरकारला याबाबत शिफारस केली.
कर्नाटक स्टेट रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनने ड्रग आणि कॉस्मेटीक १९४५ कायद्यातील ६५(१५) (बी) या नियमामध्ये औषध दुकानांवर असलेल्या केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट
हे नाव बदलून फार्मसी करण्यात
यावे ही विनंती केली होती.
जेणेकरून फार्मासिस्टचा दर्जा वाढण्यास मदत होईल. यासंदर्भात महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे म्हणाले, जगभरातील फार्मासिस्टसाठी ही नवी तरतूद स्वागतार्ह आहे. कित्येक वर्षांपासून फार्मासिस्टचा हा लढा सुरू होता. भारतात मात्र बदल झाले
नव्हते. आता लवकरच याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर हे बदल दिसून येतील. त्यामुळे फार्मासिस्टबद्दलची विश्वासार्हता आणि सन्मान वाढण्यास निश्चितच मदत होईल.

Web Title: Not chemist from now on; Then the pharmacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.