‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:47 IST2025-03-22T14:47:04+5:302025-03-22T14:47:19+5:30
विधानसभेत २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी धारावी पुनर्विकासासंदर्भातील विविध शंका आणि आरोपांचा सविस्तर खुलासा दिला.

‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’
मुंबई : धारावी पुनर्विकास हा अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईतच घरे देणारा एकमेव प्रकल्प आहे आणि धारावीतील एक इंचही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.
विधानसभेत २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी धारावी पुनर्विकासासंदर्भातील विविध शंका आणि आरोपांचा सविस्तर खुलासा दिला.
धारावीतील एकूण ४३० एकर जागेपैकी ३७ टक्के जागा खेळाची मैदाने, मनोरंजनासाठी मोकळी जागा आणि सार्वजनिक सुविधांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
‘धारावीची जागा अदानी समूहाला देण्यात आली’ हा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा दावा असून, धारावीतील संपूर्ण जमिनीचे मालकी हक्क ‘धारावी पुनर्विकास प्राधिकरण’ या राज्य सरकारच्या अखत्यारीतील कंपनीकडे आहेत, असेही त्यांनी
स्पष्ट केले.