Join us

दुसऱ्या गुणवत्ता यादीत घसरण नाही, कट ऑफ नव्वदीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 1:56 AM

Mumbai Education News : बहुतांश महाविद्यालयांतील दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कटऑफ पहिल्या यादीपेक्षा खाली न घसरता पहिल्या गुणवत्ता यादीच्या कटऑफवरच स्थिरावले आहे.

 मुंबई - अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी ही पहिल्या यादीप्रमाणेच नव्वदीपार राहिली असून विशेषतः विज्ञान व वाणिज्य शाखांच्या कटऑफ  गुणांत वाढ दिसून आली आहे. बहुतांश महाविद्यालयांतील दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कटऑफ पहिल्या यादीपेक्षा खाली न घसरता पहिल्या गुणवत्ता यादीच्या कटऑफवरच स्थिरावले आहे. एसईबीसीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवर्ग बदलल्याने हा कटऑफ खाली आला नसल्याचे मत काही प्राचार्य व्यक्त करत आहेत. शासनाच्या सूचनांनंतर अकरावी प्रवेशात मराठा आरक्षणाच्या (एसईबीसी) जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याआधी एसईबीसी वर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आपले प्रवर्ग बदलून खुल्या गटात अर्ज करावे लागले आहेत. आधीच खुल्या गटाची कठीण कठीण असलेली स्पर्धा आता आणखी कठीण झाली आहे आणि त्यामुळेच महाविद्यालयांचे कटऑफ पहिल्या यादीपेक्षा कमी होण्याऐवजी काही महाविद्यालयांत स्थिरावले किंवा काही महाविद्यालयांत वाढले आहेत. वाणिज्य आणि विज्ञान शाखेला पसंतीनेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांनी वाणिज्य व त्यानंतर विज्ञान शाखेलाच पसंती दिली असल्यामुळे नामांकित महाविद्यालयातील या शाखांचे कटऑफ काहीसे वाढलेले आहेत. रुईया , पोदार, केसी, वझे केळकर, सेंट झेविअर्स, मिठीबाई अशा अनेक नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफ गुणांत घसरण न झाल्याने ८० ते ९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयांत प्रवेश मिळणे म्हणजे स्वप्नवतच राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

कोट्यातून ७८ हजार प्रवेश निश्चित मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रक्रियेसाठी इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन, कोट्याच्या एकूण १ लाख २० हजार ३८९ जागा उपलब्ध असून आतापर्यंत यातून २६ हजार २०२ प्रवेश निश्चित झाले आहेत.  

टॅग्स :शिक्षणमहाविद्यालयमुंबई