Join us

सरसकट कर्जमाफी नको, मुख्यमंत्र्यांना पुण्यातील शेतक-यांचे निवेदन

By admin | Published: June 08, 2017 7:46 PM

राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ नका, अशा विषयाचे निवेदन पुण्यातील शेतक-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ नका, अशा विषयाचे निवेदन पुण्यातील शेतक-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. एक लाख रुपयांहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या शेतक-यांचीच कर्जमाफी करण्याची मागणी शेतक-यांनी निवेदनात केली आहे.
 
गरजू आणि गरीब शेतक-यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केल्याचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी हेमंत पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी सांगितले की, शेतक-यांच्या आंदोलनाआडून आता राजकीय नेते स्वत:ची राजकीय व आर्थिक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सरसकट कर्जमाफीमुळे 3 हजार 500 श्रीमंत शेतक-यांना कर्जमाफी मिळणार असून त्यात राज्याचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतक-यांना कर्जमाफी देऊन ते पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, म्हणून कर्जमुक्तीची पावले उचलावीत. त्यासाठी सर्वसामान्य शेतक-यांशी चर्चा करण्याचे आवाहन केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.