छत्रपती संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:05 AM2021-05-26T04:05:17+5:302021-05-26T04:05:17+5:30

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नावर चारवेळा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना भेटीसाठी वेळ दिली ...

Not giving time to Chhatrapati Sambhaji Raje is an insult to Maharashtra | छत्रपती संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान

छत्रपती संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान

Next

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नावर चारवेळा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत अशा बॉलिवूड अभिनेत्यांना भेटायला मोदींकडे वेळ आहे. पण, संभाजीराजेंसाठी नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

मोदींनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न असल्याने आमचा आक्षेप नाही, पण मराठा समाजाच्या समस्या घेऊन जाणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांना व तेही छत्रपतींच्या वंशजाला भेट न देणे हे महाराष्ट्राला कदापि आवडणार नाही, असे सावंत म्हणाले. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे, पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. चंद्रकांत पाटील हे मनकवडे आहेत असे दिसते. मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी मोदींना मराठा आरक्षण राज्याचा विषय वाटल्याने संभाजीराजे यांना मोदींनी भेट दिली नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मोदींची विषयांची समज फार कमी आहे, असे सावंत म्हणाले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही भाजपकडून त्यावर राजकारण केले जात आहे. राज्य सरकारवर सर्व ढकलून राज्यातील भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा ही आरक्षणविरोधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी जर भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर पाच वर्ष महाराष्ट्रात तसेच केंद्रातही सत्ता असताना ‘फुलप्रुफ’ आरक्षण देता आले असते. पण सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण किती ‘फुलप्रुफ’ होते हे दाखवून दिले आहे, असेही सावंत म्हणाले.

Web Title: Not giving time to Chhatrapati Sambhaji Raje is an insult to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.