काश्मीर नव्हे, ही तर मुंबई...; महापालिका क्षेत्रात ६ हजार ५०० ‘बसंत रानी’ वृक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:41 AM2019-02-01T01:41:21+5:302019-02-01T01:41:37+5:30

नयमरम्य झाडं वेधताहेत मुंबईकरांचं लक्ष

Not only Kashmir, but Mumbai ...; 6 thousand 500 'spring queen' trees in the municipal area | काश्मीर नव्हे, ही तर मुंबई...; महापालिका क्षेत्रात ६ हजार ५०० ‘बसंत रानी’ वृक्ष

काश्मीर नव्हे, ही तर मुंबई...; महापालिका क्षेत्रात ६ हजार ५०० ‘बसंत रानी’ वृक्ष

googlenewsNext

मुंबई : पूर्व उपनगरातील छेडानगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील दुभाजकावर महापालिकेतर्फे लावण्यात आलेली ‘बसंत रानी’ ही झाडे बहरली असून, हे दृश्य पाहिल्यानंतर जणूकाही आपण मुंबईत नाही, तर जम्मू-काश्मीरमध्ये आहोत की काय? असा भासच निर्माण होतो. याचे कारण या वृक्षांचे बहरणे हे असून, ही नयमरम्य झाडे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पर्यावरणाचे संवर्धन होण्यासोबतच सुशोभीकरणही साधले जावे, या दृष्टीने उद्यान खात्याद्वारे वृक्षारोपण व वृक्ष जोपासना नियमितपणे केली जात असते. गेल्या वर्षी झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात सुमारे २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ६ हजार ५०० पेक्षा अधिक ‘बसंत रानी’ वृक्षांचाही समावेश आहे. हिंदी भाषेत ‘बसंत रानी’ अशी ओळख असणाऱ्या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव ‘टॅब्यूबिया पेंटाफायला’ आहे. याच झाडाला इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रम्पेट’, ‘पिंक पाऊल’, ‘पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते. सुमारे २५ ते ३० फूट उंच असणाºया या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. मात्र, या वर्षी वसंत ऋतू सुरू होण्यापूर्वीच ही झाडे फुलांनी बहरली आहेत. फुलांनी डवरलेली ‘बसंत रानी’ची झाडे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

महापालिका घेते काळजी
फुलांनी डवरलेली बसंत रानीची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. या झाडांचे वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याचे काम महापालिकेच्याच उद्यान खात्याद्वारे नियमितपणे केले जाते.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका

Web Title: Not only Kashmir, but Mumbai ...; 6 thousand 500 'spring queen' trees in the municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.