Join us

फक्त मते नव्हे, मनेही जिंकायची आहेत- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:02 AM

निवडणुका कधीही लागतील, शिवसेनेला स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्यासाठी मतदारांची केवळ मतेच जिंकायची नसून त्यांची मनेही जिंकायची आहेत, अशा शब्दात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आणि स्वबळावर सत्ता आणण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.

मुंबई : निवडणुका कधीही लागतील, शिवसेनेला स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्यासाठी मतदारांची केवळ मतेच जिंकायची नसून त्यांची मनेही जिंकायची आहेत, अशा शब्दात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आणि स्वबळावर सत्ता आणण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमांची सुरूवात मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. तेव्हा ते बोलत होते. निवडणुकांसाठी कामाला लागा. आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही. शिवसेनेला महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवायचे नाही, तर देशपातळीवर जायचे आहे. आतापर्यंत आपण स्वत:ची ताकद कधी आजमावून पाहिलीच नाही. पण यापुढे स्वबळावर लढायचे, जिंकायचे आणि एकहाती सत्ता आणायची. त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. तुमच्या इतकेच परिश्रम करण्याची माझी तयारी आहे. किंबहुना तुमच्यापेक्षाही जास्त कष्ट करण्याची तयारी आहे. आजपासूनच कामाला लागा. सत्ता असताना आणि नसताना आपण जे करतो ते इतर कोणताही पक्ष करत नाही. शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांना रोजगार यासाठी शिवसेना जोमाने काम करीत आहे. बॉम्बस्फोट असो वा पूर जात-धर्म न पाहता शिवसैनिक रक्तदानाला उभा राहतो, अशी उदाहरणे त्यांनी दिली.माझ्यासारख्या २८ वर्षांच्या मुलाला तुम्ही मान दिला. तरुणाई हीच आपली ओळख आहे. वय वाढले, तरी मनाने थकू नका हे बाळासाहेबांचे वाक्य लक्षात ठेवा, याचे स्मरण करून देत आदित्य म्हणाले की, सत्तेत राहून आपण सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवतो. इतर राज्यात आपण निवडणुका लढवल्या. तशीच राजस्थानमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.।मोदी, शहा शिवसेनाद्वेष्टे - भटेवरापंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेनाद्वेष्टे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केले. भाजपाची चार वर्षांतील पोकळ आश्वासने, घसरणारा जनाधार या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांची नावे घेतल्याने तेथूनच मोदी व शहा यांनी सेनेवर खुन्नस काढण्यास सुरवात केल्याचे ते म्हणाले. वाजपेयी सरकार वाईट नव्हते. मात्र मोदीकाळातील गुजरातमधील परिणामांमुळे ते पडले. सध्या वाजपेयी, अडवाणी यांना मिळमाºया वागणुकीबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सत्तेत असून सरकारविरोधात भूमिका घेणे ही देशाची गरज असून त्याबद्दल त्यांनी सेनेचे अभिनंदन केले. शिवसेनेचा पुढचा संघर्ष मोठा असून देशात हुकुमशाही येणार नाही, यासाठी त्यांना राजकारणाची दिशा बदलावी लागेल, असे मतही त्यांनी मांडले.>जोशींच्या कानपिचक्याअन्य राज्यातील प्रादेशिक पक्ष एकहाती सत्ता मिळवितात. मात्र, उत्तम असून शिवसेनेला ते साध्य करता येत नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे. पक्षाला वाहून घेणारे कार्यकर्ते आणि त्यांची एकजूट आवश्यक आहे. आपण कशात कमी पडतो हे शोधून काढून ती कमतरता दूर करणे, सत्ता आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला पाहिजे. शिक्षण, आर्थिकसुबत्ता, ध्येयप्राप्ती आणि सकारात्मक विचाराकडे लक्ष द्या, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसैनिकांची शाळा घेतली. महाराष्ट्रात अजून काही भागात शिवसेना पोहोचलेली नाही. ती पोहोचायला हवी. जसे शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत आहेत, तसे महाराष्ट्रात निर्माण केल्यास शिवसेनेला कोणी हरवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.>मनसेचे शिशिर शिंदे यांची घरवापसीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे शिंदे अलीकडच्या काळात मनसेपासून दुरावले होते. शिवसेना प्रवेशानंतर आपल्या छोटेखानी भाषणात शिवसेना सोडल्याबद्दल शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांची माफी मागितली. ‘हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा. बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणे ही माझी चूक होती. यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे शिंदे म्हणाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाºया नेत्यांमध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता. २००९ मध्ये ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गेल्यावर्षी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीदरम्यान त्यांना डावलण्यात आले. तेव्हापासून ते मनसेत अस्वस्थ होते. शिंदे यांनी गेल्यावर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून पक्षातील सर्व जबाबदाºयांतून मुक्त करावे, असे म्हटले होते.

टॅग्स :आदित्य ठाकरे