"मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान नाही, गाळ किती काढला तपशील द्या"

By मनोहर कुंभेजकर | Published: May 16, 2023 03:10 PM2023-05-16T15:10:10+5:302023-05-16T15:12:12+5:30

अन्यथा तरंगता गाळ काढून सफाई झाल्याचे चित्र कंत्राटदार उभे करतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

"Not satisfied with the drainage work in Mumbai, give the details of how much silt has been removed", Says Ashish Shelar | "मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान नाही, गाळ किती काढला तपशील द्या"

"मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान नाही, गाळ किती काढला तपशील द्या"

googlenewsNext

मुंबई - मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान व्यक्त करावे अशी स्थिती नाही. महापालिकेने गाळाच्या वजनाची जशी आकडेवारी जाहीर केली, तशी किती खोल गाळ काढला याची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. त्यामुळे कळेल किती सफाई झाली. अन्यथा तरंगता गाळ काढून सफाई झाल्याचे चित्र कंत्राटदार उभे करतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील ओशिवरा नाला, लिंक रोड,भगतसिंग नाला, लिंक रोड ,वळनई नाला, वळनई मेट्रो स्टेशन जवळ,भीम नगर नाला, गोराई बोरिवली (पश्चिम),दहिसर नदी,एन. एल. नाला दहिसर (पूर्व) या विविध नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी उपमहापौर दिलीप पटेल,विनोद मिश्रा, श्रीकला पिल्लई, संदिप पटेल, कमलेश यादव, प्रियांका मोरे, प्रतिभा गिरकर, लिना देहरकर, शेजल देसाई, अंजली खेडकर, प्रवीण शहा, जगदिश ओझा, जितेंद्र पटेल, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते.

अँड.आशिष शेलार यांनी आज प्रथम ओशिवरा नदी आणि भगतसिंग नाल्याची पाहणी केली. दोन्ही ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु होते. समुद्राला भरती असल्याने पाणी भरलेले असले तरी जेसीबीच्या सहाय्याने खालून गाळ निघत असल्याचे चित्र दिसत होते. तर वळनाई नाल्यात तर गाळाचे ढिगारे आज अखेर कायम असून आज दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आल्याचे दिसत होते. त्यामुळे याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना जाब विचारला.तर भिम नगर नाल्याती सफाई करण्यात आली असली तरी नाल्याच्या काठावर अनधिकृत बांधकामे असल्याने या नाल्याची रुंदी कमी झाली आहे.  दहिसर नदीच्या सफाईचे काम अद्याप सुरु असून बराच गाळ नदीत बाकी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यात मुंबईकरांच्या घरात,इमारतीत आणि त्यांच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी शिरू नये यावर जालीम उपाय म्हणजे नालेसफाई. पालिका प्रशासन 280 कोटी रुपये नाले सफाई वर खर्च करते त्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे या प्रामाणीक भावनेने भाजपाने आज पश्चिम उपनगरातील नाले सफाईची पाहाणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: "Not satisfied with the drainage work in Mumbai, give the details of how much silt has been removed", Says Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.