Join us

डोंबिवलीत कॅबसाठी स्टँडच नाही!

By admin | Published: December 09, 2014 10:42 PM

दिल्लीतील कॅबमध्ये बलात्काराची घटना ताजी असतांनाच अशाच प्रकारे डोंबिवलीतही ‘कॅब’ चालकांसाठी अधिकृत असा कोणताही स्टँड नसल्याचे विदारक सत्य उघडकीस आले आहे.

अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
दिल्लीतील कॅबमध्ये बलात्काराची घटना ताजी असतांनाच अशाच प्रकारे डोंबिवलीतही ‘कॅब’ चालकांसाठी अधिकृत असा कोणताही स्टँड नसल्याचे विदारक सत्य उघडकीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी 
ये-जा करणा:या कॅब वर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, त्यांची कोठे नोंद होते की नाही, एखाद् वेळेस काही विचित्र घटना घडल्यास, अनुभव आल्यास नेमका कोणाशी संपर्क साधावा, तक्रार कोणाकडे द्यायची हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. 
शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे असूनही शहरभर दिवसाढवळया व रात्री - अपरात्री अनेक कॅब सर्वत्र मोकाटपणो फिरतांना आढळून येत आहेत. 
डोंबिवलीत प्रामुख्याने पूर्वेकडील भागात मानपाडा रोडवर पांडुरंग वाडी, रामनगरचा काही भाग, एमआयडीसीत घरडा सर्कल जवळ, एस.टी.स्टँडच्या परिसरात, राष्ट्रीय महामार्गावर आदी ठिकाणी या कॅब सर्रास उभ्या असलेल्या आढळतात. अलिकडे नेहरु मैदान परिसरासह ठाकुर्ली भागातील काही ठिकाणी ही वाहने उभी असल्याचे निदर्शनास येते.
मुंबई परिसरातून येथे येणा:या कॅब या ठिकाणी आल्या की त्या येथेच आडोसा बघून उभ्या राहतात, त्यामुळे एखाद् वेळेस कॉल आला की तातडीने ‘जीपीआरएस’ तंत्रप्रणालीच्या आधारे संबंधित ठिकाणी ते वाहनचालक जातात. त्यातून गि:हाईक मिळाले तरी ठिक नाही मिळाले तरी  त्याच ठिकाणी उभे राहणो ते पसंत करतात. 
विशेषत: दिवसाढवळया येणारी वाहने निघून जातात, मात्र रात्री-अपरात्री आलेली वाहने मात्र एम्प्टी(रिकामे) जाण्यापेक्षा भाडे मिळते का याची प्रतिक्षा करत गाडी आडोशाला लावून गि:हाईकाची वाट बघणो पसंत करतात. पश्चिमेकडील भागात ही वाहने जात असली तरीही त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यास जागा नसल्याने तेथेच थांबणो कॅबचे चालक पसंत करीत नाहीत.
 
अशा गाडय़ांवर अंकुश ठेवणो हे आरटीओ विभागाचे काम असून ते याकडे कानाडोळा करतात, सार्वजनिक वाहनांना स्टँड(थांबा) देणो हे त्यांचे कर्तव्य असते, या ठिकाणी तसे होतांना दिसत नाही. अवैध वाहने आढळल्यास आरटीओ त्यांचे परवानेही जप्त करु शकतात, मात्र तसे का झाले नाही याचा विचार होणो अत्यावश्यक असल्याचे एका वाहतूक पोलीस अधिका:याने लोकमतला स्पष्ट केले.
 
शहरामध्ये प्रामुख्याने कॅब गाडय़ांना थांबा(स्टँड) नाही, तरीही अनेकदा ते वाहनचालक येथे भाडे सोडण्यासाठी आले की कुठेतरी नो एंट्री अथवा आडोशाच्या ठिकाणी थांबून भाडय़ाची वाट बघतात. गेल्या दोन महिन्यात अवैधरिता थांबलेल्या तब्बल 3क् कॅबचालकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून साडेचार हजार रुपये दंड आकारला आहे. आगामी काळात ही कारवाई अधिक कडक करावी लागणार आह़े परंतु, रात्रीच्या वेळेत आलेल्यांवर चाप लावणो मुश्किल झाले आहे, त्यावरही प्रय} करु 
- बाळासाहेब कदम, पोलिस निरीक्षक, 
शहर वाहतूक विभाग-डोंबिवली