‘स्त्रीमुक्ती नव्हे, स्त्री सन्मान’

By admin | Published: April 17, 2016 01:29 AM2016-04-17T01:29:46+5:302016-04-17T01:29:46+5:30

स्त्री सन्मान म्हणजे स्त्रीच्या भावनेची कदर करणे; तिच्या गुणांची कदर करणे, तिच्या कष्टाची कदर केली पाहिजे, तिचा सन्मान करणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. नवीन वर्षात स्त्रीचा सन्मान करुया

'Not a woman's emblem, but woman honor' | ‘स्त्रीमुक्ती नव्हे, स्त्री सन्मान’

‘स्त्रीमुक्ती नव्हे, स्त्री सन्मान’

Next

मुंबई : स्त्री सन्मान म्हणजे स्त्रीच्या भावनेची कदर करणे; तिच्या गुणांची कदर करणे, तिच्या कष्टाची कदर केली पाहिजे, तिचा सन्मान करणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. नवीन वर्षात स्त्रीचा सन्मान करुया हा संकल्प करण्यास प्रल्हाद पै यांनी सांगितले.
जीवनविद्या मिशन या शैक्षणिक सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ व समाज सुधारक सदगुरू वामनराव पै यांच्या पत्नी मातृतुल्य शारदामार्इंच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पार पडला. चारकोप कांदिवली येथे ज्ञानप्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, माजी आमदार अभिजित अडसुळ, शिवसेना विभागप्रमुख शुभदा गुढेकर, स्थानिक नगरसेवक श्रीकांत कवठणकर, शिवसेना उपविभागप्रमुख संतोष राणे, भाजपाचे राजेंद्र हुले उपस्थित होते.
प्रल्हाद पै म्हणाले की, श्रीसदगुरूंनी केलेल्या समाजकार्यात माईंचे योगदान खूप मोठे होते. प्रपंचाचा सर्व भार पेलून जीवनविद्येच्या प्रचार प्रसाराची संधी त्यांनी सदगुरूंना उपलब्ध करून दिली. १०१ वी आवृत्ती प्रकाशित झालेला ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा क्रांतिकारक ग्रंथ सदगुरूंनी माईंना समर्पित केला होता. सदगुरूंनी स्त्री सन्मान या विषयावर सातत्याने मार्गदर्शन केले, व्याख्याने दिली. स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे या ग्रंथाची निर्मिती केली. स्त्री सन्मान कायम झाला पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते.
नुकत्याच झालेल्या जागतिक स्त्री दिनानिमित्त जीवनविद्या मिशनमार्फत अनेक स्तरांवर याविषयी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून हजारो स्त्रियांना आयुष्यात सक्षम व यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला महिलांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ व समाज सुधारक सदगुरू वामनराव पै यांच्या पत्नी मातृतुल्य शारदामार्इंच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पार पडला. चारकोप कांदिवली येथे ज्ञानप्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: 'Not a woman's emblem, but woman honor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.