सदावर्तेंच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, रजिस्टर; लाखोंची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:32 PM2022-04-19T16:32:28+5:302022-04-19T16:37:17+5:30

सरकारी वकिलांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती; सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Note counting machine found in gunratna sadavarte house public prosecutor tells court | सदावर्तेंच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, रजिस्टर; लाखोंची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर?

सदावर्तेंच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, रजिस्टर; लाखोंची मालमत्ता पोलिसांच्या रडारवर?

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सदावर्तेंची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली आहे. सदावर्तेंच्या घरात काय काय सापडलं, याची संपूर्ण माहिती घरत यांनी न्यायाधीशांना दिली.

सदावर्तेंच्या घरात पोलिसांना नोटा मोजण्याची मशीन आढळून आल्याची माहिती घरत यांनी न्यायमूर्तींना दिली. सदावर्तेंच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. रजिस्टरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख आहे. याचा तपास होण्याची गरज आहे. त्यासाठी सदावर्तेंची चौकशी व्हायला हवी. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवून देण्याची विनंती घरत यांनी न्यायालयाकडे केली. घरत यांनी न्यायालयात दिलेल्या नव्या माहितीमुळे सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख सदावर्तेंच्या घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये आहे. भायखळा, परळ परिसरात सदावर्तेंच्या मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे कारदेखील आहे. या मालमत्तांची खरेदी एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पैशांमधून झाली का, याचा तपास पोलिसांकडून केला जाण्याची दाट शक्यता आहे. सदावर्तेंच्या घरात सापडलेल्या वस्तू आणि कागदपत्रांमुळे प्रकरणाला नवं वळण मिळू शकतं.

Web Title: Note counting machine found in gunratna sadavarte house public prosecutor tells court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.