नोटा बदलण्यासाठी लागले साडेआठ तास

By admin | Published: November 12, 2016 06:01 AM2016-11-12T06:01:52+5:302016-11-12T06:01:52+5:30

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी आणल्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे सामान्य नागरिकांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. बँकेतून ४००० रुपये मिळण्यासाठी आयटी

The notes began to change for only eight and a half hours | नोटा बदलण्यासाठी लागले साडेआठ तास

नोटा बदलण्यासाठी लागले साडेआठ तास

Next

मनोहर कुंभेजकर , मुंबई
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी आणल्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे सामान्य नागरिकांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. बँकेतून ४००० रुपये मिळण्यासाठी आयटी पार्कजवळील म्हाडा सोसायटीत राहणाऱ्या गणेश सावंत यांनी सकाळी ९.३० वाजता दिंडोशीच्या बँक आॅफ इंडियाच्या बाहेर रांग लावली. दुपारी पत्नीला रांगेत उभे करून ते कामावर अर्धा दिवस गेले. पत्नीच्या हाती सायंकाळी ६ वाजता शंभराच्या चाळीस अर्थात चार हजार रुपये मिळाले. घरी परतत असताना पत्नीने ४००० रुपये मिळाल्याचे सांगताच सावंत यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
दिंडोशीतील या बँकेला भेट दिली असता, नागरिक सकाळपासूनच भर उन्हात उभे राहून आपला नंबर कधी लागणार याची वाट बघत होते. येथे ४००० रुपये घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी एकच रांग असल्यामुळे नागरिकांना उशिरापर्यंत रांगेत उभे राहावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. दिंडोशीच्या एचडीएफसी बँकेतदेखील सकाळपासूनच नागरिकांनी रांग लावली होती.
वांद्रे (पूर्व) टीचर्स कॉलनीजवळील बँक आॅफ महाराष्ट्र येथील बँकेत पैसे घेण्यासाठी भर उन्हात नागरिक, महिला रांगेत उभे होते. यारी रोड येथील न्यू इंडिया को-आॅपरेटिव्ह बँकेतदेखील पैसे काढण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी रांग लावली होती. मात्र सरकारी बँकेत पैसे मिळायला वेळ लागत असल्याने लोक खासगी, सहकारी बँकांकडे वळत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

Web Title: The notes began to change for only eight and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.