‘त्या’ बारा पोलीस अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यासंदर्भातील नोटीस केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 06:49 AM2020-03-04T06:49:46+5:302020-03-04T06:50:08+5:30
मात्र मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या नोटिशीला अधिका-यांनी दिलेले उत्तर समर्थनीय ठरवत ती रद्द ठरवली आहे.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक, मुंबई या ठिकाणी बदली मिळावी यासाठी १२ पोलीस अधिकाऱ्यांनी
पोलीस महासंचालकांकडे परस्पर पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी त्यांची वेतनवाढ एका वर्षासाठी का रोखली जाऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस त्यांना बजावली होती. मात्र मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या नोटिशीला अधिका-यांनी दिलेले उत्तर समर्थनीय ठरवत ती रद्द ठरवली आहे. परमबीर सिंग यांनी शनिवारी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय
घेतले. त्यापैकीच एक म्हणजे पोलीस खात्यातील १२ अधिकाºयांनी बर्वे यांच्या काळात पोलीस महासंचालकांना पत्र पाठवित त्यांची एटीएसमध्ये बदली करावी, असा विनंतीअर्ज दाखल केला होता. यामध्ये सध्या सशस्त्र दलात कार्यरत असलेले नितीन अलकनुरे, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम, मालाड पोलीस ठाण्याचे सुधीर दळवी, मध्य नियंत्रण कक्षातील नंदकुमार गोपाळे, संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे ज्ञानेश्वर वाघ, तत्कालीन
खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ‘चकमक’फेम दयानंद नायक, घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीप बने, मलबार हिल पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विल्सन रॉड्रिक्स, अंबोली पोलीस ठाण्याचे विशाल गायकवाड, गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, नवघर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी आणि गुन्हे शाखेच्या (वेब डेव्हलपमेंट सेंटर) साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी
कोळी यांचा समावेश होता. ही बाब बर्वे यांना समजल्यानंतर या १२ अधिकाºयांचे वर्तन बेशिस्त असून शिस्तबद्ध पोलीस दलास अशोभनीय असल्याचे ठरवत या अधिकाºयांची वर्षभरासाठी वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये? अशी
विचारणा करणारी नोटीस त्यांनी बजावली होती. मात्र सिंग यांनी या अधिकाºयांनी नोटिशीला दिलेले उत्तर समर्थनीय असून, वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेबाबतची नोटीस रद्दबातल ठरवत त्यांना दिलासा दिला. तसेच पुन्हा असे
घडणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांना बजावण्यात आले.