खाटांची माहिती अपडेट न करणाऱ्या २२ नर्सिंग होम्स, रुग्णालयांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:26 AM2020-10-02T02:26:03+5:302020-10-02T02:26:31+5:30

खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने मे महिन्यात संगणकीय डॅशबोर्ड तयार केला. यावर मुंबईतील ३३ मोठ्या रुग्णालयांकडून नियमित खाटांची माहिती दिली जाते.

Notice to 22 nursing homes and hospitals for not updating bed information | खाटांची माहिती अपडेट न करणाऱ्या २२ नर्सिंग होम्स, रुग्णालयांना नोटीस

खाटांची माहिती अपडेट न करणाऱ्या २२ नर्सिंग होम्स, रुग्णालयांना नोटीस

Next

मुंबई : रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती नियमित पालिकेच्या संगणकीय डॅशबोर्डवर अपडेट न करणाºया २२ नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावली. संबंधित रुग्णालयातून डॅशबोर्डवर अपडेट माहिती देण्यात येईल, याची खात्री करण्याची जबाबदारी स्थानिक साहाय्यक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असणार आहे.

खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने मे महिन्यात संगणकीय डॅशबोर्ड तयार केला. यावर मुंबईतील ३३ मोठ्या रुग्णालयांकडून नियमित खाटांची माहिती दिली जाते. मात्र छोटे नर्सिंग होम्स व रुग्णालये वेळेवर माहिती देत नसल्याने प्रत्यक्ष पालिकेने बाधित रुग्ण पाठविल्यानंतर संबंधित रुग्णालयातील खाटेवर रुग्ण दाखल केल्याचे आढळून आले आहे. यामुळे खाटांचे नियोजन बिघडत असून अनावश्यक तुटवडा जाणवत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिकेने २२ नर्सिंग होम्स, रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये निरलॉन रुग्णालय, बोरीवलीचे अपेक्स रुग्णालय, बालाजी, लाइफलाइन या रुग्णालयांचा समावेश आहे. सर्व रुग्णालयांमधील खाटांचे नियोजन पालिकेच्या विभाग स्तरावरील वॉर रूममार्फतच केले जात आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिलेल्या कोणत्याही रुग्णालयाला थेट रुग्ण दाखल करून घेता येणार नाही, असे पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

रुग्णांच्या सोयीला प्राधान्य
रिक्त खाटांची माहिती अपडेट न करणाºया नर्सिंग होम आणि रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. काही नर्सिंग होम उशिरा माहिती अपडेट करीत असतात. त्यांना समज देण्यात आली आहे. मात्र ही नोटीस म्हणजे त्यांना केवळ चेतावणी असून त्यांच्यावर अंकुश राहावा यासाठी आहे. त्या - त्या विभागातील साहाय्यक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी अशा रुग्णालयांवर यापुढे लक्ष ठेवतील. जेणेकरून खाटेअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)

Web Title: Notice to 22 nursing homes and hospitals for not updating bed information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.