Join us

‘भूखंड वापसी’साठी २४ संस्थांना नोटीस

By admin | Published: February 03, 2016 3:22 AM

काळजीवाहू तत्त्वावर दिलेले भूखंड परत घेण्याचा ‘उत्तरार्ध’ पालिकेने सुरू केला आहे. खेळाचे मैदान व उद्यानांची देखभाल करणाऱ्या ३६ संस्थांकडून भूखंडांचा ताबा पालिकेने परत घेतला आहे़ आता

मुंबई : काळजीवाहू तत्त्वावर दिलेले भूखंड परत घेण्याचा ‘उत्तरार्ध’ पालिकेने सुरू केला आहे. खेळाचे मैदान व उद्यानांची देखभाल करणाऱ्या ३६ संस्थांकडून भूखंडांचा ताबा पालिकेने परत घेतला आहे़ आता दुसऱ्या टप्प्यात २४ संस्थांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ तसेच परत कोणत्या संस्थेने न्यायालयातून स्थगिती आणू नये, म्हणून कॅवेट दाखल करण्याचा निर्णयदेखील पालिकेने घेतला आहे़खेळाचे मैदान व उद्यानांसाठी पालिकेने दत्तक धोरण आणले़ मात्र या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन २१६ भूखंड परत घेण्याचे आदेश पालिकेला दिले़ त्यानुसार पालिकेने संबंधित संस्थांना नोटीस बजाविण्यास सुरुवात केली़ पहिल्या टप्प्यात ३६ संस्थांना नोटिसा देण्यात आल्या़मात्र माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि एका बड्या संस्थेने न्यायालयात धाव घेतली़ परंतु न्यायालयात पालिकेच्या बाजूनेच निकाल लागल्यामुळे अखेर या दोन भूखंडांचा ताबा प्रशासनाला परत मिळवता आला़ त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पालिकेने २४ संस्थांना नोटिसा पाठवून भूखंड परत करण्याची मुदत दिली आहे़ (प्रतिनिधी)