शहरातील ९०० जणांना नोटीस

By admin | Published: April 5, 2015 01:05 AM2015-04-05T01:05:13+5:302015-04-05T01:05:13+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यापैकी ४३० जणांवर कारवाई झाली असून उर्वरितांवर देखील लवकरच कारवाई केली जाणार आहे.

Notice to 900 people in the city | शहरातील ९०० जणांना नोटीस

शहरातील ९०० जणांना नोटीस

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यापैकी ४३० जणांवर कारवाई झाली असून उर्वरितांवर देखील लवकरच कारवाई केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीची आचारसंहितालागू झाली असून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही सुरवात झाली आहे. ही निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. निवडणूक काळात शहरात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवायांना सुरवात केली आहे. एकूण ९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार असल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्यापैकी ४३० जणांना विविध कलमाअंतर्गत नोटिसा बजावल्या असून उर्वरित ७३७ जणांवर देखील लवकरच कारवाई केली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळातही पोलिसांनी अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. त्यापैकी अनेकांवर अद्यापही प्रतिबंधात्मक आदेश लागू असलेल्यांना महापालिका निवडणुकीदरम्यान दुबार कारवाईतून वगळण्यात आले आहे.
किरकोळ गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगारांसह राजकीय गुन्हे दाखल असलेल्यांवर देखील प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे. त्याकरिता गेल्या पाच वर्षांचा आढावा घेण्यात आल्याचे उपआयुक्त उमाप यांनी सांगितले. सी.आर.पी.सी. आणि बी.पी. अ‍ॅक्टच्या विविध कलमांतर्गत या कारवाया केल्या जाणार आहेत. त्यामध्ये सीआरपीसी १४९ अंतर्गत ८१६ जणांवर कारवाई होणार आहे. उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्यासाठी गुन्हेगारांचा वापर केला जावू शकतो. त्यामुळे निवडणूक काळात शहरात तणावाची शक्यता आहे. अनेकांच्या पक्ष परिवर्तनाने सध्या शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यामुळे अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये उघड वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारांनुसार संवेदनशील मतदान केंद्रे ठरवली जाणार आहेत. त्याकरिता सर्वपक्षीयांकडून उमेदवार निश्चित होण्याची प्रतीक्षा असल्याचेही उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

च्निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता केल्या जाणाऱ्या कारवायांमध्ये कोपरखैरणे पोलीस ठाणेअंतर्गत सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाया होणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ऐरोली, दिघा, खैरणे, तुर्भे,नेरुळ यासह इतर काही ठिकाणी तणाव निर्माण करणारे प्रकार घडलेले आहेत.
च्त्यावेळी पोलिसांच्या नोंदीवर आलेल्या राजकीय व्यक्तींनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सत्तेसाठी चुरस सुरु असून निवडणुकीच्या रिंगणात या दोन पक्षातच खरी लढत होईल. यामुळे अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांचे आपसात खटके उडण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी खबरदारी घेतली.

Web Title: Notice to 900 people in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.