Join us

मॅटचा आदेशानंतरही बदली न केल्याने महासंचालक पांडे यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्याकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध लढणारे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्याकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध लढणारे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी आता राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी पंगा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅट’च्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने त्यांना अवमान याचिका दाखल करण्याबाबत नोटीस पाठवली आहे. २५ ऑगस्टपर्यंत त्यांना आपल्या बदलीबाबत कार्यवाही करण्याची मुदत दिली आहे.

घाडगे यांनी अवमान याचिका दाखल करण्याबाबत पोलीस महासंचालकांना नोटीस दिली आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे हे ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे नियुक्त होते. तिथून त्यांची बदली ५०० किलोमीटर दूर अकोला येथे करण्यात आली. याविरोधात घाडगे हे मॅट कोर्टात गेले होते. यावेळी त्यांनी आपल्याविरोधात अनेक खटले आहेत. त्यांच्या सुनावणीसाठी सुट्टी घेऊन यावे लागले. यामुळे मला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नजीक बदली देण्यात यावी, अशी त्यांनी याचिकेत मागणी केली होती. त्यावर ३ नोव्हेंबर २०२० रोजी मॅटच्या चेअरमन न्या. मृदुला भाटकर यांनी घाडगे यांची बदलीच्या अर्जाचा विचार करावा, तर त्यानंतर मॅटचे दुसरे सदस्य पी. के. कुरहेकर यांनी ४ मार्च २०१२ रोजी घाडगे यांची बदली सर्वसाधारण बदलाच्या वेळी करावी, असे आदेश दिले होते. मात्र १४ ऑगस्टला करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी नोटीस बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.

घाटगे बदलीसाठी अकोला जिल्हा अधीक्षक यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यानंतर २० एप्रिलला संजय पांडे यांना भेटून बदलीसाठी विनंती केली होती मात्र २९४ अधिकाऱ्याचा बदल्या करताना त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.