संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस, उद्या चौकशीला बोलावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:41+5:302020-12-29T04:06:41+5:30

राऊतांकडून मात्र इन्कार : पीएमसी बँक घोटाळा प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी महसूलमंत्री ...

Notice of ED to Sanjay Raut's wife, summoned for questioning tomorrow | संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस, उद्या चौकशीला बोलावले

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस, उद्या चौकशीला बोलावले

Next

राऊतांकडून मात्र इन्कार : पीएमसी बँक घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आता शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचे समजते.

ईडीच्या नोटिसीच्या वृत्तानंतर संजय राऊत यांनी, ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना,’ असे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला, तर नोटिसीबाबत माध्यमांनी विचारले असता, मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, असे राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी वातावरणनिर्मिती करण्यामध्ये संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजाविली होती. त्यानंतर गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्याबाबत टीकेची झोड उठविली आहे.

खडसे यांना भोसरी भूखंडप्रकरणी ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले आहे.

विरोधात गेले तर अशा प्रकारची कारवाई

ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधी आहेत म्हणून जुने प्रकरण उकरून काढून केवळ त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे. प्रताप सरनाईक असोत किंवा एकनाथ खडसे ही सर्व जुनी प्रकरणे आहेत. बरोबर होते, तेव्हा वेगळी परिस्थिती होती. मात्र, आता विरोधात गेले तर अशा प्रकारची कारवाई होत आहे.

- सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

Web Title: Notice of ED to Sanjay Raut's wife, summoned for questioning tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.