मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआय व नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला मंगळवारी नोटीस बजावली.न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी सीबीआय, हवाई वाहतूक मंत्रालयाला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. २८ जूनला यूव्ही एव्हिएशनच्या किंग एअर-९० या एअरक्राफ्टचा अपघात होऊन ते घाटकोपर येथे कोसळले. यात एअरक्राफ्टमधील चार कर्मचारी व एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले यशवंत शेणॉय यांनी याचिकेद्वारे केली आहे.
घाटकोपर विमान दुर्घटना, सीबीआय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:22 AM