सिडको, नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:40 AM2018-06-08T00:40:20+5:302018-06-08T00:40:20+5:30

नवी मुंबई येथील पाणथळीच्या जागेवर सिडको बांधकामाचे डेब्रिज टाकत असल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने सिडकोला व नवी मुंबई पालिकेला गुरुवारी नोटीस बजावली.

 Notice from the High Court of CIDCO, Navi Mumbai Municipal Corporation | सिडको, नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाकडून नोटीस

सिडको, नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाकडून नोटीस

Next

मुंबई : नवी मुंबई येथील पाणथळीच्या जागेवर सिडको बांधकामाचे डेब्रिज टाकत असल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने सिडकोला व नवी मुंबई पालिकेला गुरुवारी नोटीस बजावली.
संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला पाठवा, असे निर्देश न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाºयांना दिले. तर सिडको व नवी मुंबई पालिकेला पाणथळीच्या जमिनीच्या भोवतालचे सर्व बांधकाम पुढील आदेश देईपर्यंत थांबविण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
खारघर येथील सेक्टर १८ व १९ या भागात तलाव व पाणथळ जमीन आहे. सुमारे सहा हेक्टर पाणथळ जमिनीवर बांधकामाचे डेब्रिज आणि कचरा टाकण्यात येत आहे. हे काम सिडकोच्या आदेशावरून होत असल्याचा आरोप ‘अभिव्यक्ती’ या एनजीओने जनहित याचिकेद्वारे केला आहे.येथील रहिवाशांनी यापूर्वी अनेक वेळ पोलिसांकडे व उच्च न्यायालयाने यासंबंधी नेमलेल्या समितीकडे तक्रार केल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष झा यांनी न्यायालयाला सांगितले. या याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात ठेवली आहे.

Web Title:  Notice from the High Court of CIDCO, Navi Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.