Join us

नगरपालिका कर्मचा-यांच्या संघटनेने शासनाला १ सप्टेंबरपासून दिली बेमुदत संपाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:57 AM

राज्यातील नगरपालिका कर्मचा-यांच्या संघटनेने शासनाला १ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस शुक्रवारी दिली.

मुंबई : राज्यातील नगरपालिका कर्मचा-यांच्या संघटनेने शासनाला १ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस शुक्रवारी दिली. नगरपालिका कर्मचाºयांना १०० टक्के वेतन अनुदान देण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन मागण्या मान्य कराव्यात, असे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.याआधी एक दिवसीय कामबंद आंदोलनासह काळ्या फिती लावून संघटनेने शासनाचा निषेध व्यक्त केला होता. त्याची दखल घेत नगरविकास खात्याच्या सचिवांसोबत बैठक पार पडल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली. घुगे म्हणाले की, सचिवांनी बैठकीत सकारात्मक चर्चा करत संचालक स्तरावरील मागण्या पूर्ण करण्यासाठी संचालकांना आदेश दिले आहेत. मात्र धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणे गरजेचे असून, त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सचिवांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.राज्यातील ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाºयांचा नगरपंचायतीच्या सेवेत समावेश करून घ्यावा, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.अत्यावश्यक सेवाही संपावर१ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही उतरणार असल्याचे संघटनेने सांगितले.