लोअर परळ येथील मॅकडोनाल्डला नोटीस, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:28 AM2018-01-11T06:28:35+5:302018-01-11T06:29:37+5:30
अन्न व सुरक्षा कायद्यानुसार हॉटेल आस्थापनांनी परवान्याची प्रत दर्शनी भागात ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) प्रदीप राऊत व आणि अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांनी लोअर परळ येथील मे. हार्डकॅस्टल रेस्टॉरंट मॅकडोनाल्डस् येथे अचानक भेट दिली असता येथे परवाना दर्शनी भागात आढळून आला नाही.
मुंबई : अन्न व सुरक्षा कायद्यानुसार हॉटेल आस्थापनांनी परवान्याची प्रत दर्शनी भागात ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) प्रदीप राऊत व आणि अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांनी लोअर परळ येथील मे. हार्डकॅस्टल रेस्टॉरंट मॅकडोनाल्डस् येथे अचानक भेट दिली असता येथे परवाना दर्शनी भागात आढळून आला नाही. याशिवाय, या ठिकाणी सखोल चौकशी केली असता विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे अन्न व सुरक्षा कायद्यांतर्गत मॅकडोनाल्डला तत्काळ सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.
मॅकडोनाल्डस्सारख्या मोठ्या फूडचेन्समध्ये बरेच लोक येतात. अशावेळी या आस्थापनांनी सुरक्षेच्या निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र वारंवार कायद्याचे उल्लंघन होताना दिसून येते. त्यामुळे अशा चेन रेस्टॉरंटस्ची तपासणी मोहीम हातात घेऊन तरतुदींचे पालन न करणाºया आस्थापनांविरुद्ध कारवाईचा बडगा एफडीएने हाती घेतला आहे. याविषयी माहिती देताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले की, विभागाने सुचविलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.