Join us

अनिल देशमुखांवरील दोषारोपपत्राची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 9:53 AM

डिसेंबर २०२१मध्ये ईडीने देशमुख व त्यांच्या मुलांवर ७००० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुखांसह त्यांच्या दोन मुलांनाही ईडीने आरोपी केले आहे. त्यापूर्वी ईडीने १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांवर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. आरोपपत्राची दखल घेतल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

डिसेंबर २०२१मध्ये ईडीने देशमुख व त्यांच्या मुलांवर ७००० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुखांसह त्यांच्या दोन मुलांनाही ईडीने आरोपी केले आहे. त्यापूर्वी ईडीने १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत सीबीआयने २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यानंतर ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.   

टॅग्स :अनिल देशमुख