लोकसेवा आयोगाच्या NDA व नौसेना अकादमी परिक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 06:50 PM2021-04-17T18:50:35+5:302021-04-17T18:51:28+5:30
उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोविङ-19 प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे
मुंबई - बृहन्मुंबई मधील 36 उपकेंद्रांवर रविवार 18 एप्रिल रोजी संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय रक्षा अकादमी व नौसेना अकादमी (1) परीक्षा 2021 ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या 13 एप्रिल रोजीच्या Break the Chain आदेशातील मुद्दा क्र. 9 (डी) व महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचेकडील आदेश MCG/A/6202 यातील मुदा 1 नुसार उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोविङ-19 प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.