धार्मिक स्थळांना नोटीस
By admin | Published: March 26, 2015 11:59 PM2015-03-26T23:59:29+5:302015-03-26T23:59:29+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र केली आहे
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार सिडकोच्या जागेवर अतिक्र मण करून बांधलेल्या धार्मिक स्थळांकडेही मोर्चा वळविण्यात आला आहे. सिडको वसाहतीतील शेकडो बेकायदा धार्मिक स्थळांना बांधकाम नियंत्रण विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत मंदिर वा इतर धार्मिक स्थळांना हात लावू देणार नाही असा पवित्रा धार्मिक संघटनांनी घेतला आहे.
सिडको परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये अनेक धर्मांचे लोक आहेत. परिसरात प्रार्थनास्थळ असावे, असे या नागरिकांना वाटते. सिडकोने याबाबत आपले धोरणच ठरवले नव्हते. काही ठराविक धार्मिक स्थळांकरिता सिडकोने जागा दिली असली तरी अनेक समाज, पंथ, संस्था सामाजिक मंडळांकडून धार्मिक व सामाजिक कार्याकरिता जागेची मागणी होत होती, मात्र सिडकोने याकडे कानाडोळा केला.
काही मोकळ्या जागेवर धार्मिक स्थळ स्वखर्चाने बांधण्यात आली. आजमितीला सिडकोच्या जागेवर अशा प्रकारे ३७३ धार्मिक स्थळे असल्याचे समोर आले आहे. यापैकी काही भूखंड विविध कारणांकरिता राखीव असल्याने सिडकोकडून संबंधितांना पूर्वी नोटिसाही बजावल्या होत्या. अनेकदा ही स्थळे तोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी या कारवाईला विरोध दर्शविला. मोकळ्या जागेवर होत असलेल्या धार्मिक स्थळांचा विचार करीत व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी रिलिझेस पॉलिसी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ३७३ संस्थान, संस्था आणि नोटिसा बजावलेले कमिटीकडे युक्तिवाद करतील. संस्थान किती जुने आहे, याबाबत पुरावेही सादर करावयाचे आहेत.
च्सिडको वसाहतीतील धार्मिक स्थळ बेकायदेशीर असल्याबाबत नोटिसा बजाविल्याने या भागातील सर्व संस्थान, मंडळ आणि ट्रस्टींची खांदा वसाहतीत बैठक झाली.
च्सिडकोने घेतलेल्या भूमिकेचा सर्वांनी एकमुखी विरोध दर्शवला.
खांदा वसाहतीत राखीव जागेवर शनेश्वर आणि हनुमानाचे मंदिर उभारले आहे. या ठिकाणी हजारो भाविक येऊन उपासना करतात. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्र म मंदिरात पार पडतात. त्यामुळे आमचे संस्थान सिडकोला निर्धारित दराने किंमत अदा करण्यास तयार आहे. मंदिरावर कारवाई करून जनतेच्या धार्मिक भावना दुखवू नये, असे आवाहन संस्थानच्यावतीने करीत आहोत.
-शिवाजी थोरवे, अध्यक्ष,
शनेश्वर सेवा संस्थान,खांदा वसाहत