घोटाळेबाज ठेकेदारांना लवकरच नोटीस

By admin | Published: May 7, 2016 12:58 AM2016-05-07T00:58:48+5:302016-05-07T00:58:48+5:30

रस्ते घोटाळ्यात दोषी ठरलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे दोन ठेकेदारांना पुलाच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे़ त्यामुळे या सहा ठेकेदारांना रस्ते घोटाळ्या

Notice to scam contractors soon | घोटाळेबाज ठेकेदारांना लवकरच नोटीस

घोटाळेबाज ठेकेदारांना लवकरच नोटीस

Next

मुंबई : रस्ते घोटाळ्यात दोषी ठरलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे दोन ठेकेदारांना पुलाच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे़ त्यामुळे या सहा ठेकेदारांना रस्ते घोटाळ्याप्रकरणी पुढच्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे़ मात्र ही कारवाई अंगाशी येऊ नये, यासाठी पालिकेने मसुदा तयार करण्याची जबाबदारी विधी खात्यावर सोपविली आहे़
३४ रस्त्यांच्या कामांमध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आल्यानंतर पालिकेने जबाबदार सहा ठेकेदारांवर कारवाई सुरू केली़ त्यानुसार या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झाली़ मात्र एकीकडे ठेकेदारांवर कारवाई होत असताना यापैकी दोन ठेकेदारांना २२६ कोटी रुपयांचे पूल बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे़ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याप्रकरणी या ठेकेदारांकडे नोटीसद्वारे जाब मागविण्यात येणार आहे़ नोटीस दिल्यानंतर या ठेकेदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास मनाई करणे शक्य होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Notice to scam contractors soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.