Join us

विद्यार्थिनीला वसतिगृह खाली करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:34 AM

मुलुंड येथील वसतिगृह : कोरोना संकटात रस्त्यावर राहण्याची आली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करत असलेल्या अनाथ विद्यार्थिनीस समाजकल्याण विभागाने सात दिवसात वसतिगृह खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या विद्यार्थिनीस रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकीकडे परीक्षांचे नियोजन वेळेवर होत नसताना नोकरी करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढचे शिक्षण कसे घ्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. या प्रकारामुळे सरकारने अशा विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी अन्यथा या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर राहण्यास येऊ, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.

विद्यार्थिनीने सांताक्रुझ येथील महिला विद्यापीठातून एलएलएम अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना या विद्यार्थिनीस वसतिगृहात प्रवेश मिळाला. शिक्षणासोबत काम करून ती आपला खर्च भागवत आहे. लॉकडाऊनमुळे वसतिगृहातील सर्व विद्यार्थी घरी गेले आहेत. परंतु पंडित ही अनाथ असल्याने ती वसतिगृह सोडू शकली नाही. मिळेल ते खाऊन आजवर ती या वसतिगृहात राहात आहे. असे असतानाच या विद्यार्थिनीस समाजकल्याण विभागाने १९ सप्टेंबर रोजी नोटीस बजावत वसतिगृह खाली करण्याची नोटीस दिली आहे. आपण वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थिनी नसल्याने जानेवारीपासून खोली सोडून जाण्याची तोंडी सूचना देण्यात आल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. समाजकल्याण आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे खोली खाली न केल्यास नियमाप्रमाणे आपणावर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या विद्यार्थिनीस मुंबई विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. येथे प्रवेश घेऊन याच वसतिगृहात राहण्याचा तिचा विचार होता. परंतु लॉकडाऊनमुळे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्याने विद्यार्थिनीचा प्रवेश झाला नाही. यामुळे या विद्यार्थिनीस वसतिगृह सोडण्याची वेळ आली आहे. नोकरी करून स्वत:च्या जिद्दीने शिक्षण घेणाºया अनाथ विद्यार्थ्यांवर लॉकडाऊनमुळे मोठे संकट कोसळले आहे. यामुळे अनेक अनाथ मुलांनापुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर अनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहू द्यावे व त्यांच्यासाठी मेस सुरू करावी. अनाथ विद्यार्थी हे शिक्षणासाठी वसतिगृहात राहतात. त्यांचे अजून महाविद्यालय सुरू झाले नाही, या विद्यार्थ्यांचे आईवडील किंवा परिवार नाही. त्यामुळे मायबाप सरकारने त्यांची व्यवस्था करावी, अन्यथा या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर राहण्यास येऊ, असा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ता अ‍ॅड. अजय तापकीर यांनी दिला आहे.एलएलएमचा अभ्यासक्रम केला पूर्णविद्यार्थिनीने सांताक्रुझ येथील महिला विद्यापीठातून एलएलएम अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना या विद्यार्थिनीला वसतिगृहात प्रवेश मिळाला. शिक्षणासोबत काम करून ती आपला खर्च भागवत आहे. लॉकडाऊनमुळे वसतिगृहातील सर्व विद्यार्थी घरी गेले आहेत. परंतु पंडित ही अनाथ असल्याने ती वसतिगृह सोडू शकली नाही. मिळेल ते खाऊन आजवर ती या वसतिगृहात राहात आहे.