सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, सोशल मीडियावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:41 AM2022-06-30T11:41:37+5:302022-06-30T11:42:06+5:30

शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष सुरू असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरू आहेत.

Notice to Sena-BJP office bearers, attention on social media | सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, सोशल मीडियावर लक्ष

सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, सोशल मीडियावर लक्ष

Next

मुंबई : एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार गुरुवारी गोव्यातून मुंबईत येणार आहेत. शिंदे गट आणि ठाकरे सरकार यांच्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करत संबंधितांना १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. 

शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष सुरू असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विधान भवनासह मुंबईतल्या प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.  

मुंबईत पोलीस उपायुक्त दर्जाचे २० अधिकारी, सहाय्यक आयुक्त ४५, पोलीस निरीक्षक २२५, फौजदार ७२५, पोलीस अंमलदार २५००, तसेच एसआरपीएफच्या १० कंपन्यांसह अतिरिक्त ७५० जणांसह एकूण जवळपास ५ हजार पोलिसांचा फौजफाटा विधानभवन परिसरासह महत्त्वपूर्ण ठिकाणी तैनात असणार आहे. तसेच, गरजेनुसार यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचेही मुंबई पोलीस प्रवक्ते संजय लाटकर यांनी सांगितले आहे. 

दुसरीकडे, आंदोलन, निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तसेच भाजपच्या काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करू नका. आक्षपार्ह फोटो किंवा बॅनरबाजी करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावरील घडामोडींवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे.

सीआरपीएफचे दोन हजार जवान दाखल
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले असून तीन विशेष विमानाद्वारे  दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत.
 

Web Title: Notice to Sena-BJP office bearers, attention on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.