भाजपा, काँग्रेससह १४ पक्षांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:25 AM2019-03-08T05:25:40+5:302019-03-08T05:25:46+5:30
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने भाजपा, काँग्रेससह १४ पक्षांना नोटिसा पाठविल्या असून, १० मार्चपर्यंत खर्चाचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने भाजपा, काँग्रेससह १४ पक्षांना नोटिसा पाठविल्या असून, १० मार्चपर्यंत खर्चाचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
नियमानुसार राजकीय पक्षांना खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, १४ राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांच्या खर्चाचा तपशील दिला नाही. त्यामुळे पक्षाची नोंदणी रद्द का
करण्यात येऊ नये, अशी
नोटीस आयोगाकडून बजावण्यात आली आहे. भारतीय
कम्युनिस्ट पक्ष, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, सपा, एमआयएम, एआयडीएमके, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), जनता दल (सेक्युलर), लोकजनशक्ती पार्टी आणि जनता दल (युनायटेड) या पक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे.