- शेफाली परब -पंडितमुंबई : दक्षिण मुंबईत दोन इमारतींच्या मध्यभागी असलेल्या हाउस गल्ल्यांची कचराकुंडी झाली आहे. यामुळे येथील जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असून, स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. याची गंभीर दखल घेऊन महापालिकेने घराच्या खिडकीतून हाउस गल्ल्यांमध्ये कचरा टाकणाºया ९०० रहिवासी, सोसायट्यांना नोटीस पाठविली आहे. यापैकी काहींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दक्षिण मुंबईत काळबादेवी, भुलेश्वर अशा ठिकाणी तत्कालीन मुंबईच्या आराखड्यानुसार दोन इमारतींच्या मधोमध हाउस गल्ली आहे. अनेक वेळा नागरिक घराच्या खिडकीतून या हाउस गल्ल्यांमध्ये कचरा टाकत असतात. याबाबत वारंवार सूचना देऊनही हाउस गल्ल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. याउलट जीर्ण जलवाहिन्यांमुळे हाउस गल्ल्यांमधील दूषित पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरत आहे.हाउस गल्ल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येते. मात्र, याचा कोणताच परिणाम होत नसल्याचे पाहून सी विभाग कार्यालयाने आतापर्यंत ९०० सोसायट्या, भाडेकरू, घरमालक, रहिवाशांना नोटीस पाठविली आहे.तसेच पालिकेच्या विधि खात्यामार्फत कायदेशीर कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे न्यायालयात खटलाचालवून संबंधित सोसायटी अथवा रहिवाशांना दंड ठोठाविण्यात येणार आहे.दूषित पाण्याची तक्रारकाळबादेवी, पायधुनी, चंदनवाडी या भागांत १,७७९ हाउस गल्ल्या आहेत. आॅक्टोबर, २०१८ मध्ये पहिल्या आठवड्यात येथील रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत होता. दोन आठवडे ही तक्रार असल्याने या विभागात काही काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. हाउस गल्ल्यांमधील जलवाहिन्यांतील गळतीमुळे हा दूषित पुरवठा सुरू होता. त्यानंतर, या ठिकाणी हाउस गल्लीच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले होते.हाउस गल्लीमध्ये नागरिक कचरा टाकत असल्याने त्या तुंबतात. परिणामी, जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा संभावतो, तसेचयेथील कचºयावर उंदीर पोसले जात असल्याने स्थानिक रहिवाशांना लेप्टोसारख्या आजाराचा धोका आहे. त्यामुळे आधी स्थानिक रहिवाशांमध्ये जागृतीवर भर देण्यात आला. हाउस गल्लीमध्ये कचरा टाकणे कसे धोकादायक ठरू शकते, याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतरही कचरा फेकणे सुरूच ठेवणाºयांना नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली. अशा ९०० नोटीस पाठविण्यातआल्या आहेत. - सुनील सरदार, सहायक आयुक्त, सी विभाग
खिडकीतून कचरा फेकणाऱ्या ९00 सोसायट्यांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 5:23 AM